• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

क्रीडा विभागाच्या जागेवर अतिक्रमण…

by pravin
January 21, 2022
in अन्य खेळ, जिल्हास्तरीय, बातम्या
क्रीडा विभागाच्या जागेवर अतिक्रमण...

उपसंचालक उर्मिला मोराळे जागेची पाहणी करताना .

Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (आकांक्षा रक्ताटे ) क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या मालकीच्या पडेगाव गट नंबर 23 औरंगाबाद येथील एकूण 62 आर शासकीय जमिनीवर अतिक्रमण होत आहे. याबाबत आधीक्षक भुमी अभिलेख कायार्लय दुष्यंत कुळी यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील ते त्यावर निर्णय घेत नाही.

कोणा केले अतिक्रमण वाचा –

क्रीडा व युवक सेवा औरंगाबाद यांच्या मालकीची व ताब्यातील एकूण 62आर  शासकीय जमिनीवर नदीम मोहम्मद अजमदउल्ला रजाउल्ला , फरहातउल्लानखान हमीदखान, मोहम्मद फरहत अब्बास मोहम्मद अब्दुल खयुम सौदागर, मोहम्मद फजलूरहेमान उवेत मोहम्मद अब्दुल शफा शब्बीर, अजाज अहेमद सिद्दिकी यांनी बनावट दस्तऐवजाच्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत हातमिळवणी करून स्व:ताच्या नावाचे रजिस्ट्री करून घेतली असून त्याआधारे सातबाराला नाव नोंद करून मागील एक वर्षापासून उपसंचालिका क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद यांच्या जागेवर हळूहळू अतिक्रमण करून आता त्या ठिकाणी वालकम्पऊड  तयार करून औरंगाबाद ते कन्नड या रस्त्याला लागून असलेल्या पाण्याचा नैसर्गिक प्रभाग मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर पक्के बांधकाम करण्यास सुरुवात केलेली आहे.

याविषयी स्पोर्ट्स पॅनोरमाने उर्मिला मोराळे त्यांची प्रतिक्रिया घेतली असता, मोराळे बोलताना म्हणाल्या वारंवार तक्रार करून देखील भुमिअभिलेख विभागाने गट क्रमांक 23 च्या खुणा अद्याप पर्यंत ही करून दिलेल्या नाहीत. वारंवार विचारणा करून देखील भूमिअभिलेख विभाग यावर तातडीने पाऊल उचलत नाही ,खूप कालखंड उलटून गेला असून सुद्धा योग्य ती माहिती कार्यालयास मिळत नाही व कठोर पावले उचलली जात नाही. तसेच मोराळे म्हणाल्या, यापूर्वी त्या जागी कुणी खरेदी केली असेल तरीही नागरिकांनी शासकीय जागा असून सुद्धा खात्री करून घ्यावी.या विषयी आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना जमिनीवर अनाधिकूत असल्याही बांधकाम परवानगी देण्यात येऊ नयेत .

पडेगाव औरंगाबाद येथील गट क्रमांक 23 मधील एक एकर 22 गुंठे या शासकीय मालकी हक्काच्या जागा मोजणीयाबाबत कार्यालयाने दिनांक 19 -11 -2019 रोजी रक्कम रुपये 13,500 रक्कम भरली असून , पडेगाव औरंगाबाद येथील गट क्रमांक 23 मधील एक एकर 22 गुंठे या शासकीय मालकी हक्काच्या जागेत बाबत अजूनही जागा मोजणी झालेली असून जागेचे डिमार्केशन झालेले नसल्याने, जागेवर नदीम यांनी शासनाच्या मालकी हक्काच्या जागेवर प्लॉटिंग केलेली आहे .तसेच शासनाच्या मालकी हक्काच्या जागा भाडेतत्त्वावर दिलेल्या असून त्यावर वाहन दुरुस्तीचे गॅरेज सुरू केलेली आहे ही जागा कार्यालय अंतर्गत येणारे राष्ट्रीय छात्र सेना कार्यालय सुरू करण्याबाबत प्रस्तावित असून मौजे पडेगाव औरंगाबाद येथील गट क्रमांक 23 मधील एक एकर 12 गुंठे या शासकीय मालकी हक्काच्या जागेवर डिमार्केशन लवकरात -लवकर करावी असे आदेश उर्मिला मोराळे यांनी करून देखील कारवाई अद्यापही करण्यात आली नाही.

पाहा अतिक्रमण करण्यात आलेला जागा 

 

स्पोर्ट्स पॅनोरमाने  दुष्यंत कोळी यांना संपर्क साधला असता गट क्रमांक १० गट क्रमांक २३  मधले असणारे सर्व वाद निकाली लावले गेले असल्याचं सांगितलं. स्पोर्ट्स पॅनोरमा ने विचारले असता उपसंचालक मोराळे यांनी गट क्रमांक 23 च्या अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारचे डिमार्केशन  करून देण्यात आलेला नाही, . खूप कालखंड गेला असल्यामुळे दोन दिवसाची माहिती कळवतो असे असे बोलताना म्हणाले. त्यांनी पुढील दोन दिवसात माहिती देतो अशी टाळाटाळ केली.

मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व नागरिकांचे फसवणूक झाली आहे ,असे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगली. यापूर्वी जागा खरेदी केली असली व शासकीय जागा असली तरीसुद्धा खात्री करून घ्यावी.

Tags: AURAGABADENCROACHMENTsport
ShareTweetSend
Next Post
विभागीय जिल्हा क्रीडासंकुलासाठी अनुदानात वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी

विभागीय जिल्हा क्रीडासंकुलासाठी अनुदानात वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.