• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, October 9, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

by pravin
October 9, 2026
in पुरस्कार, राज्य
Reading Time: 1 min read
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

प्रतिनिधी | पुणे 

महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी सन २०२४–२५ आणि सन २०२५–२६ या दोन्ही वर्षांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या खेळाडू अथवा व्यक्तींना १२ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने ९ ऑक्टोबर रोजी पत्र जारी केले आहे.

राज्याच्या क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना शासनाच्या वतीने विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यामध्ये ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच खेळाडू, साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडू या प्रकारांतील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचा समावेश आहे.

सुधारित नियमावलीनुसार अर्ज प्रक्रिया

संचालनालयाच्या पत्रानुसार, २९ डिसेंबर २०२३ आणि २५ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयांनुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली विहित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४–२५ आणि सन २०२५–२६ या दोन्ही वर्षांच्या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रमांतील सहभागी आणि दिव्यांग खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

१५ नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत अर्जाची संधी

अर्ज केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारले जाणार आहेत. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ५९ सेकंदापर्यंत अर्ज सादर करता येतील, असे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: Maharashtra Sports AwardsShiv Chhatrapati Sports Awardsऑनलाइन अर्जक्रीडा पुरस्कार २०२४–२५क्रीडा पुरस्कार २०२५–२६क्रीडा मार्गदर्शकदिव्यांग खेळाडूमहाराष्ट्र क्रीडा विभागशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार
ShareTweetSend

ताज्या बातम्या

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

India vs New Zealand ODI probable squad bumrah shami return

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शमी-बुमराहसह ५ खेळाडूंचे कमबॅक? जाणून घ्या संभाव्य संघ

रणजी करंडकासाठी सौराष्ट्रचा संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन

रणजी करंडकासाठी सौराष्ट्रचा संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन

ऑस्ट्रेलियाने रचला नकोसा इतिहास; कसोटीत उतरवला ३० पेक्षा जास्त वयाच्या खेळाडूंचा संघ

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीतून पाकिस्तानला वगळले; त्रयस्थ ठिकाणाची मागणी अमान्य, बांगलादेशला संधी

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.