• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Monday, November 23, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( सांघिक )

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

by pravin
November 23, 2026
in खेळ ( सांघिक ), राष्ट्रीयस्तरीय, सॉफ्टबॉल, स्पर्धा
0 0
राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी

चंदिगड येथे झालेल्या ७० व्या राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने रौप्य, तर मुलांच्या संघाने कांस्यपदक पटकावले. मुलींच्या रौप्यपदक विजेत्या संघात छत्रपती संभाजीनगरच्या ओवी शेळकेचा समावेश असल्याने शहराच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एका राष्ट्रीय यशाची नोंद झाली आहे.

भारतीय शालेय खेळ महासंघ (एसजीएफआय) आणि चंदिगडच्या शालेय शिक्षण संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने १८ ते २२ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा झाली. चंदिगड येथील सेक्टर ३७ मधील हॉकी स्टेडियमवर १९ वर्षांखालील मुला-मुलींचे सामने पार पडले.

मुलींची अंतिम फेरीत चुरशीची झुंज

महाराष्ट्राच्या मुलींनी साखळी आणि बाद फेरीतील सामने जिंकत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदाच्या अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राला यजमान चंदिगडकडून ३–२ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महाराष्ट्राच्या संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

कर्णधार स्वरांजली देशपांडेच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या संघात छत्रपती संभाजीनगरच्या ओवी शेळकेने स्थान मिळवले होते.

हरियाणावर मात करत मुलांना कांस्य

महाराष्ट्राच्या मुलांनीही उत्कृष्ट कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य सामन्यात छत्तीसगडकडून पराभव झाल्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत महाराष्ट्राने जोरदार पुनरागमन केले. हरियाणाचा ११–१ असा एकतर्फी पराभव करत मुलांनी कांस्यपदक निश्चित केले. श्रीराज पाटीलने महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाचे नेतृत्व केले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ चंदिगडच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपायुक्त नीना कालिया आणि बिंदू अरोरा यांच्या हस्ते झाला. यावेळी एसजीएफआय अधिकारी द्रोणवीर सिंग यादव, गुरप्रीत सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. विजेत्या संघांना चषक, तर खेळाडूंना पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

महाराष्ट्राच्या दोन्ही संघांना राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर चौधरी यांच्यासह गणेश बेटुदे, संतोष आवचार, पांडुरंग कदम, भाकित मेश्राम आणि ईश्वरी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष डॉ. दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे आणि डॉ. उदय डोंगरे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, अक्षय बिरादार, वरिष्ठ लिपिक सदानंद सवळे, गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक सागर रूपवते, सचिन बोर्डे आणि भीमा मोरे यांनीही दोन्ही संघांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्राचे पदकविजेते संघ

मुलींचा संघ : स्वरांजली देशपांडे (कर्णधार), अनुष्का सावंत, ऋतुजा पवार, देवाश्री देशकर, आणिया बालपांडे, आर्या पोळकर, श्रीलेखा देवकर, आर्या चौधरी, कृतिका पाटील, मनस्वीनी नाईक, वंशिका लोखंडे, श्रेया तोडमल, दीक्षा मेन, अंतरा तांदळे, सुचित्रा गोंधळी आणि ओवी शेळके.

मुलांचा संघ : श्रीराज पाटील (कर्णधार), कुणाल पाटील, यश वाघ, कुणाल रायसिंग, रोहित वाघ, गणेश चौधारी, अनोश कांबळे, श्रवण जाधव, ओम शिंदे, आयुष कांबळे, वंश मिश्रा, अनुराग झा, वेदांत घुगे, ओम चव्हाण, तेजस तेलंगे आणि शंतनु धायगुडे.

Tags: १९ वर्षांखालील स्पर्धाSGFISports Panoramaओवी शेळकेकांस्यपदकचंदिगडछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र सॉफ्टबॉल संघराष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉलरौप्यपदक.

pravin

Related Posts

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई
खेळ ( वैयक्तिक)

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

November 23, 2026
राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य
खेळ ( वैयक्तिक)

राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य

November 23, 2026
रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच
क्रिकेट

रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

November 23, 2026
आरुष बेदमुथाचे १२ बळी; छत्रपती संभाजीनगरचा एक डाव आणि ८६ धावांनी विजय
क्रिकेट

आरुष बेदमुथाचे १२ बळी; छत्रपती संभाजीनगरचा एक डाव आणि ८६ धावांनी विजय

November 20, 2026
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
Boxing

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 18, 2026
पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी
क्रिकेट

पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी

November 18, 2026
Load More

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026

indian xxx video film telegram ✓ Discover Top Indian Adult Content Channels

February 15, 2025

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

November 23, 2026
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

November 23, 2026
राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य

राष्ट्रीय शालेय टेनिसमध्ये वृंदिका राजपूतला सुवर्ण; श्रीनाथ कुलकर्णीचा समावेश असलेल्या महाराष्ट्र संघाला रौप्य

November 23, 2026
रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

रिक्रिएशन, लातूर व जळगाव संघांची आगेकूच

November 23, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Boxing
  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

राष्ट्रीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींना रौप्य, मुलांना कांस्य

November 23, 2026
राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; ११ सुवर्णांसह २७ पदकांची कमाई

November 23, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In