छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
जयपूर येथे झालेल्या २१ व्या राष्ट्रीय एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी ११ सुवर्ण, नऊ रौप्य आणि सात कांस्य अशी एकूण २७ पदके मिळवत राष्ट्रीय स्तरावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
राजस्थानमधील जयपूर येथे १२ ते १६ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार पडली. नॅशनल डेव्हलपमेंट, यूथ, ज्युनिअर आणि सीनियर अशा चार वयोगटांत झालेल्या स्पर्धेत सुमारे २१ राज्यांतील ७०० खेळाडूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून या स्पर्धेसाठी ७६ खेळाडूंची निवड करण्यात आली होती.
वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांत पदकांची कमाई
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वैयक्तिक पुरुष व महिला, मिक्स पेअर, ट्रिओ, ग्रुप, एरो डान्स आणि एरो स्टेप या प्रकारांत प्रभावी संच सादर केले. अर्णव चोपकर, अवंतिका सानप, स्वराज गट्टूवार, रिया नाफडे, उदय मधेकर, मानसी देशमुख, निहार भोगले आणि धनश्री खंडारे यांच्यासह खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
नॅशनल डेव्हलपमेंट गटात अर्णव चोपकरने वैयक्तिक पुरुष प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यूथ गटात अवंतिका सानपने वैयक्तिक महिला प्रकारात सुवर्णयश मिळवले. याच गटातील ट्रिओ, ग्रुप आणि एरो डान्स प्रकारांतही महाराष्ट्राने सुवर्णपदके जिंकली.
ज्युनिअर गटात ट्रिओ आणि एरो डान्स, तर सीनियर गटात मिक्स पेअर, ट्रिओ, एरो डान्स आणि एरो स्टेप प्रकारांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांना गवसणी घातली.
महाराष्ट्र संघाला प्रशिक्षक मनीष थट्टेकर, राहुल पहुरकर, धैर्यशील देशमुख, गौरव चेंबूरकर, संदीप लटपटे आणि डॉ. हर्षल मोगरे यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून दीपाली बजाज आणि गणेश ठाकरे यांनी जबाबदारी सांभाळली.
पंच म्हणून अमेय जोशी, सिद्धार्थ कदम, सीएमए विवेक देशपांडे आणि ऋग्वेद जोशी यांची निवड करण्यात आली होती. स्पर्धाप्रमुख डॉ. मकरंद जोशी यांनी स्पर्धेची तांत्रिक बाजू सांभाळली.
पदकविजेत्या खेळाडूंचा तपशील
नॅशनल डेव्हलपमेंट गट
- वैयक्तिक पुरुष — सुवर्ण: अर्णव चोपकर.
- वैयक्तिक महिला — कांस्य: अनन्या गर्जे.
- मिक्स पेअर — कांस्य: लक्षिता दाभोळकर आणि अक्षत मोहिते.
- ट्रिओ — कांस्य: शार्वनी कप्पा, आरोही खंडारे आणि अनन्या गर्जे.
यूथ गट
- वैयक्तिक पुरुष — रौप्य: स्वराज गट्टूवार.
- वैयक्तिक महिला — सुवर्ण: अवंतिका सानप.
- मिक्स पेअर — रौप्य: सोहम बुरकुले आणि सिद्धी मल.
- ट्रिओ — सुवर्ण: आयुष मुथीयान, अद्वैत काचेवार आणि प्रसाद बिराजदार.
- ग्रुप — सुवर्ण: स्वराज गट्टूवार, सूर्य सौंदळे, आयुष मुथीयान, प्रसाद बिराजदार आणि प्रणित बोडखे.
- एरो डान्स — सुवर्ण: वर्णीका गुप्ता, मेहिका गुप्ता, वसुधा जगताप, इंद्रीजा चंद्रे, देहावती मुळे, महिरा शीलकर, स्वरा मालेवार आणि आगरता बकाले.
ज्युनिअर गट
- वैयक्तिक महिला — रौप्य: रिया नाफडे.
- मिक्स पेअर — कांस्य: निहार भोगले आणि धनश्री खंडारे.
- ट्रिओ — सुवर्ण: निहार भोगले, निर्णेय मुस्रीफ आणि आर्यन फुले.
- ट्रिओ — रौप्य: जान्हवी रोघे, रिधिमा आव्हाड आणि ओम सोनी.
- ग्रुप — रौप्य: निर्णेय मुस्रीफ, ओम सोनी, सानावी सौंदळे, पुष्टी अजमेरा आणि रिया नाफडे.
- एरो डान्स — सुवर्ण: रिया नाफडे, सानावी सौंदळे, पुष्टी अजमेरा, धनश्री खंडारे, जान्हवी रोंघे, गुंजन कलानी, वेदी राठी आणि इशिका बजाज.
सीनियर गट
- वैयक्तिक पुरुष — रौप्य: उदय मधेकर.
- वैयक्तिक महिला — रौप्य: मानसी देशमुख; कांस्य: श्रेया लोंढे.
- मिक्स पेअर — सुवर्ण: श्रीपाद हराळ आणि मानसी देशमुख; रौप्य: गौरी ब्राह्मणे आणि रामदेव बिराजदार.
- ट्रिओ — सुवर्ण: आर्या शाह, स्मित शाह आणि रामदेव बिराजदार.
- ग्रुप — रौप्य: उदय माडेकर, अद्वैत वझे, स्मित शाह, विश्वेश पाठक आणि पार्थेश मार्गपवार.
- एरो डान्स — सुवर्ण: श्रेया लोंढे, अदिती तळेगावकर, राधा सोनी, सयाली वझारकर, कार्तिकी हेकडे, गौरी कलाने, गौरी ब्राह्मणे आणि मुग्धा भावसार.
- एरो स्टेप — सुवर्ण: अभय उंटवाल, तानिष्क राजेगावकर, विश्वेश जोशी, अनिकेत चौधरी, संकेत चिंतलवाड, संदेश चिंतलवाड, दीपक अर्जुन आणि यशवंत पवार.
या यशाबद्दल महाराष्ट्र ॲमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ. मकरंद जोशी, भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभागाच्या उपसंचालक डॉ. मोनिका घुगे, सहायक संचालक सुमेध तरोडेकर आणि विभागीय क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि पंचांचे अभिनंदन केले.
मसांमचे अध्यक्ष राम पातूरकर, सचिव हेमंत पातूरकर, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष ॲड. संकर्षण जोशी, अध्यक्ष डॉ. आदित्य जोशी, उपाध्यक्ष डॉ. रणजीत पवार, सचिव डॉ. हर्षल मोगरे आणि कोषाध्यक्ष रोहन श्रीरामवार यांनीही संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.
डॉ. विशाल देशपांडे, डॉ. सागर कुलकर्णी, महेश सोनी, अमेय जोशी, संदीप गायकवाड, राहुल तांदळे, रोहित रोंगे, शत्रुंजय कोटे तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण पश्चिम विभागाचे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक संजय मोरे आणि तनुजा गाढवे यांनी पदकविजेत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या















