विभागीय जिल्हा क्रीडासंकुलासाठी अनुदानात वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अध्यक्षस्थानी

गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्यातील क्रीडा विश्वात युवा खेळाडूंच्या गुणवत्तेला चालना मिळावी म्हणून राज्यातील क्रीडा सुविधा वाढवण्यासाठी आता विभागीय क्रीडा, संकुल जिल्हा ,क्रीडा संकुल तसेच तालुका क्रीडा संकुलासाठी वाढीव अनुदान देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यातून नव्या निर्णयानुसार विभागीय क्रीडा संकुलासाठी आता ५०  कोटीचे अनुदान मिळणार आहे. परंतु यापूर्वी याची मर्यादा ही २४  कोटी होती ,आता यात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुलाच्या अनुदानामध्ये पटीने वाढ झाली आहे. यातूनच आता हे अनुदान २५  कोटी रुपये असणार आहे यापूर्वीही रक्कम आठ कोटी रुपये होती.
तसेच तालुका क्रीडा संकुलनासाठी आता ८  कोटींचे अनुदान मिळणार आहे. यापूर्वी एक कोटीचे अनुदान मिळत होते. ही सुधारित अनुदान मर्यादा या पुढे प्रशासकीय मान्यता देण्यात येणाऱ्या व बांधकाम सुरू करण्यात येणाऱ्या क्रीडासंकुलासाठी लागू राहणार आहे,असे या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आले.

पाहूयात या संकलनासाठीचे काही नियम-

जे क्रीडा संकुल यांना यापूर्वी प्रशासकीय मान्यता दिली असून बांधकाम पूर्ण झाले आहे ,अथवा बांधकाम सुरू आहे अशा संकुलांना बाबत तालुका क्रीडा संकुल ३  कोटी, जिल्हा क्रीडा संकुल१५  कोटी व विभागीय क्रीडा संकुल ३०  कोटी रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. हे सुधारित अनुदान अशा क्रीडा संकुलामध्ये अतिरिक्त क्रीडा मूलभूत सुविधा यांचे बांधकाम नवीन क्रीडा उपकरणे व साहित्य तसेच उपलब्ध क्रीडा सुविधांचे बळकटीकरण याकरिता वापरता येईल.

You might also like

Comments are closed.