छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): गरवारे स्टेडियम येथे सुरू असलेल्या 17 वर्षा खालील व्हेरॉक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज गुरुवार 4 रोजी स्टेपिंग स्टोन आणि वुडरिज या दोन्ही संघांनी स्पर्धेत प्रत्येकी दोन सामने लागोपाठ विजय प्राप्त केला आहे त्याचबरोबर एसबीआय संघाने पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे.
आज पहिला सामना एमजीएम स्कूल विरुद्ध स्टेपिंग स्टोन संघात झाला यामध्ये एमजीएम संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला स्टेपिंग स्टोन संघाने 20 षटकात 7 बाद 135 धावा करत 136 धावांचे आव्हान दिले यामध्ये आरेझ खानने 36 चेंडू 56 धावा करत अर्धशतकीय खेळी केली त्यामध्ये दहा चौकार मारत संघाचा धाव फलक मजबूत केला एमजीएम स्कूल कडून गोलंदाजी मध्ये उत्कर्ष जाधव येणे चार षटकार 28 धावा देत तीन गडी बाद केले रोहित मार्गेने तीन षटकात 17 धावा देत 2 गडी बाद केले.
एमजीएम संघाकडून फलंदाजी मध्ये वेदांत काटकर ने एक चौकार मारत 37 चेंडू 30 धावा आणि दोन चौकार मारत 25 चेंडू 23 धावा केल्या. गोलंदाजी मध्ये स्टेपिंग स्टोन संघा कडून अक्षत रवंदल ने चार षटकात 15 धावा देत 4 गडी बाद केले आरेझ ने तीन षटकात 12 धावा देत 2 गडी बाद करत सामनावीर ठरला. एमजीएम संघ 117 मध्ये संपूर्ण संघ बाद झाला आणि स्टेपिंग स्टोन संघाने 18 धावांनी विजय प्राप्त केला.
दुसऱ्या सामन्यामध्ये एस.बी.ओ.ए संघाने एम पी एस स्कूल विरुद्ध दहा गडी राखून विजय प्राप्त केला यामध्ये संघाने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेत पंधरा षटकांमध्ये 62 धावा करत संपूर्ण संघ बाद झाला . गोलंदाजी मध्ये मी तीन षटकात 12 धावा देत दोन गडी बाद , मयुरेश देशपांडे दोन षटकार दोन धावा देत दोन गडी बाद, वेदांत मानेने एक षटकार दोन धावा देत दोन गडी बात केले आणि ओम निकम, अभिर जोशी, वेद मुंडे प्रत्येकी एक गडी बात करत फलंदाजी मध्ये वेदने नाबाद चार चौकार मारत 38 चेंडू मध्ये 36 धावा आणि दीपक साबळेने एक षटकार 29 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या. सलामी जोडीने संघास दहा गडी राखून एकतर्फी विजय प्राप्त करून दिला.
दुपारी दोन वाजून 27 मिनिटांनी सुरू झालेल्या तिसऱ्या सामने एसबी हायस्कूल विरुद्ध वुडरिज स्कूल सामन्यांमध्ये एसबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली वीस षटकामध्ये 8 गडी बाद 90 धावाचे आव्हान दिले वुडरिज संघाने गोलंदाजी मध्ये पुष्कर मिसाळ, तनिष पवार, तीर्थ साठे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले फलंदाजी मध्ये धैर्य वाकडे याने चार चौकार एक षटकार मारत 37 चेंडू मध्ये नाबाद 34 धावा , हर्षित जोशीने एक चौकार तीन षटकार मारत 27 चेंडू मध्ये 32 धावा केल्या संघास तेरा षटकामध्ये तीन गडी बाद 94 धावा करत विजय प्राप्त करून दिला.
स्पर्धेची गुण तालिका खालीलप्रमाणे
उद्याचे सामने