औरंगाबाद – टाक बॉक्सिंग अकॅडमीचा खेळाडू गौरव म्हस्केची अम्मन जॉर्डन येथे दिनाक २७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ दरम्यान होणाऱ्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियन साठी निवड झाली आहे.
गौरव हा आता तो 81 किलो वजन गटात खेळेल.गौरव हा उत्तम खेळाडू असून ,तो सराव देखील करतो.आता त्याची एशियन बॉक्सिंग चॅम्पियन साठी निवड झाली आहे.
तर गौरव म्हस्के हा विभागीय क्रीडा संकुलमध्ये नियमित सराव करतो.
त्याने आतापर्यंत २ राज्यस्तरीय सुवर्ण पदक आणि ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेले आहे.तसेच त्याला प्रशिक्षक राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या निवडीबद्दल क्रीड़ा उपसंचालक सुहास पाटील व संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी , उपाध्यक्ष डॉ. केजल भट, सचिव पंकज भारसाकाळे यांनी अभिनंदन केले.व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.