दिल्ली- दिल्ली न्यायालयाने भारताचे राष्ट्रीय टेबल टेनिस प्रशिक्षक सौम्यदीप रॉय आणि भारतीय टेबल टेनिस महासंघाला (TTFI) दोषी ठरवले आहे. सौम्यदीप रॉय यांच्यावर मॅच फिक्सिंगचे आरोप होते. भारताची स्टार टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने सौम्यदीप यांच्यावर पात्रता फेरीत मॅच फिक्सिंग करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. यानंतर दिल्ली न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे .
मनिका बत्राने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षकाची मदत घेण्यास नकार दिला होता, त्यानंतर महासंघाने मनिकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. यावर प्रतिक्रिया देताना मनिकाने सांगितले, राष्ट्रीय प्रशिक्षकाने मला फिक्सिंगसाठी सांगितले होते. जर सौम्यदीप माझ्यासोबत प्रशिक्षक म्हणून बसले असते, तर मी सामन्यावर लक्ष केंद्रित करू शकली नसती.
Delhi High Court has suspended the TTFI Executive Committee for six months, with an administrator to be appointed in a week while passing an order in the case filed by Manika Batra #TableTennis
— Amol Karhadkar (@karhacter) February 11, 2022