केरळ – करंडक स्पर्धेसाठी केरळ संघात भारताचा वेगवान गोलंदाज शांताकुमारन श्रीशांतची आगामी रणजी निवड करण्यात आली आहे. ३९ वर्षीय वेगवान गोलंदाज जवळपास नऊ वर्षांनंतर स्थानिक स्पर्धांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
२००७ टी-२० विश्वचषक आणि २०११च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या श्रीशांतने त्याच्या सोशल मीडियावर गोलंदाजी करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले. यात एका व्हिडिओमध्ये श्रीशांतने डावखुऱ्या फलंदाजाला आऊटस्विंगरवर क्लीन बोल्ड केले.
https://www.instagram.com/tv/CZySRjOFH_F/?utm_source=ig_web_copy_link