टी-२० मालिकेसाठी ‘मराठी’ खेळाडूची टीम इंडियात एन्ट्री; हे बाहेर!

दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. या दोन खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुडा यांचा बदली संघात समावेश करण्यात आला आहे.

या महत्त्वाच्या बदलाची माहिती बीसीसीआयने आज शुक्रवारी दिली. ९ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना राहुलच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, तर अक्षर कोविड-१९ मधून सावरत आहे. दोन्ही खेळाडू आता फिटनेससाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार आहेत.

You might also like

Comments are closed.