पंजाब किंग्जची सह-मालकीण बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा उद्या आणि परवा होणाऱ्या (१२ आणि १३ फेब्रुवारी) आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनमधून बाहेर पडली आहे. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ती मुलाला सोडून भारतात येऊ शकत नाही. प्रीती झिंटाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. हा लिलान बंगळुरू येथे होणार आहे. यावेळी ८ ऐवजी १० संघ लिलावात सहभागी होणार आहेत.
४७ वर्षीय प्रीती झिंटाने लिलावाच्या एक दिवस आधी शुक्रवारी तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वतःचा एक फोटो अपलोड केला आणि ट्विट केले, मी यावेळी आयपीएल लिलाव २०२२ मध्ये भाग घेऊ शकणार नाही. मी माझ्या लहान मुलाला सोडून भारतात येऊ शकत नाही. गेल्या काही दिवसांपासून मी आणि माझी टीम लिलाव आणि क्रिकेटच्या सर्व गोष्टींवर एकत्र चर्चा करण्यात व्यस्त होतो.
This year I’m going to miss the IPL Auction as I cannot leave my little ones & travel to India.The last couple of days have been hectic discussing d auction & all things cricket with our team.I wanted to reach out to our fans & ask them if they hv any player suggestions.. pic.twitter.com/oIOCqZT3PN
— Preity G Zinta (@realpreityzinta) February 11, 2022
यापूर्वी पंजाब संघाचा फलंदाजी प्रशिक्षक वसीम जाफरने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एका मजेदार मीमच्या माध्यमातून त्याने ट्विटरवर ही माहिती शेअर केली आहे. वसीम २०१९ मध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील झाला होता.
आयपीएल २०२२ लिलावापूर्वी पंजाब किंग्जने मयांक अग्रवाल आणि युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना कायम ठेवले आहे. पंजाबने मयंकला १२ कोटी रुपयांना तर अर्शदीपला ४ कोटी रुपयांना संघात कायम ठेवले आहे. पंजाब किंग्जचा संघ सर्वाधिक ७२ कोटी रुपये घेऊन आयपीएल मेगा लिलावात उतरणार आहे.