हिंगोली- मराठवाडयात हिंगोली जिल्ह्यातील भांडेगाव येथे भव्यदिव्य निमंत्रीत कबड्डी स्पर्धे पार पडली. त्यामध्ये साई सेवा क्रीडा मंडळ औरंगाबाद संघाने स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे .
स्पर्धेत मातोश्री संघ बळेगाव मुंबई,स्वराज्य सोलापूर,वीर वसंत मौजा, रोहतक-हरियाना, जाणता राजा तोंडगाव ,जय हनुमान चिंचाळा ,मध्यप्रदेश, छत्तीसगड, टायगर वाशिम, जाणता राजा परभणी,तरूण संघर्ष पाथरी, साई क्रीडा मंडळ खेडुळा, बहिर्जी वसमत,सुवर्णयुग यवतमाळ,प्रशांत फाऊंडेशन रायगड, गोदा फार्म कळमनुरी, पुणे,बिलासपूर, मुंबई पोलीस,बालमित्र मंडळ पालघर, भगवती संघ,शिवशक्ती मंडळ कलंबा महाली,शिवाजी मंडळ वाखारी, जय हनुमान पेडगाव, शारदा प्रतिष्ठान बीड,रणवीर संघ भेंडा फॅक्टरी ,शारदा अकॅडमी गेवराई,शिवशंभु क्रीडा मंडळ उपनगर मुबंई,स्वामी विवेकानंद नवलगव्हाण,केदारनाथ मुंबई, आदर्श औढानागनाथ, अशा 32 बलाढ्य संघानी सहभाग नोंदवला होता.
मुंबई (बळेगाव)संघाकडून प्रो कबड्डी खेळाडु विकास काळे व अक्षय जाधव तसेच बीपीसीएल चा आदित्य शिंदे व हरियानाचे खेळाडु याचा तुफानी खेळ भांडेगावच्या ग्रामस्थांना बघायला मिळाला. हजारोंच्या संख्येने प्रेक्षकवर्गानी स्पर्धा बघण्यासाठी हजेरी लावली होती. प्रत्येक सामना हा हृदयाची धडधड वाढवणारा होता. गोदा फार्म कळमनुरी व हरियाना या दोन संघादरम्यान सामना पाच- पाच चढाया मध्ये हरियाना या संघाने बाजी मारली.
साई सेवा क्रीडा मंडळ औरंगाबाद व मातोश्री मुबंई या दोन संघादरम्यान सामना खुपच प्रेक्षणीय झाला. मातोश्री कडून प्रो कबड्डी स्टार विकास काळे,अक्षय जाधव यांच्या तुफानी चढाया व औरंगाबाद संघाची तेवढ्याच ताकतीची फिल्डींग जोशपूर्ण खेळ करत होती. पहिल्या हाफ मध्ये असे वाटत होते की, सामना कोण जिंकेल असी परिस्थीती निर्माण झाली होती. विकास काळे व अक्षय जाधव यांच्या आक्रमण पकडी करत औरंगाबाद संघ एक एक गुण घेत संघाला आघाडी मिळवून देत होता…शेवटच्या मिनिटापर्यंत औरंगाबाद चे खेळाडु मुंबई च्या संघाविरुद्ध कडवी झुंज देत होते शेवटी बलाढ्य मुंबई संघाचे औरंगाबाद संघाने पाणीपत केले.
सेमी फायनल हिंगोली असोसिएशन (मध्यप्रदेश चे खेळाडु) विरूध्द साई सेवा क्रीडा मंडळ औरंगाबाद या दोन संघादरम्यान झाले.
मध्यप्रदेश च्या खेळाडुसोबत औरंगाबाद चे खेळाडु संयमाने खेळ करत आक्रमक पवित्रा घेत औरंगाबाद संघाने मध्यप्रदेश (हिंगोलीअसोसिएशन) सहजच मात केली. अंतीम सामना औरंगाबाद विरूध्द छत्तीसगड(चिंचाळा),हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. मध्यातर पर्यंत सामना बरोबरीत होता …शेवच्या पाच मिनिटापर्यंत कोण जिंकेल असी अवस्था निर्माण झाली होती पण छत्तीसगड च्या तुफानी चढायापट्टुनी बहारदार खेळ करत औरंगाबाद संघाला पराभूत केले.भांडेगावच्या भव्य दिव्य निमंत्रीत कबड्डी स्पर्धेत बलाढ्य संघा सोबत औरंगाबाद संघाने चुरशीच्या लढती करत या स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले आहे
स्पर्धेत चा निकाल…
प्रथम क्रमांक-छत्तीसगड (चिंचाळा)
व्दितीय क्रमांक- साई सेवा क्रीडा मंडळ औरंगाबाद
तृतीय क्रमांक-हरियाना (भांडेगाव)
चतुर्थ क्रमांक-मध्यप्रदेश (हिंगोलीअसोसिएशन).या यशस्वी कामगिरी बद्दल संघा चे प्रशिक्षक डॉ.माणिक राठोड यांचे व खेळाडूंचे मंडळाचे अध्यक्ष मा. महापौर नंदकुमार घोडेले, औरंगाबाद जिल्हा असो.चे अध्यक्ष डॉ.दत्ताभाऊ पाथरीकर, डॉ.विजय पाथरीकर, नाथपुराम सोसायटीचे रोडे सर, संजय टोम्पे, एरंडे सर, निलेश पाटील, बाबासाहेब खडके, गौतम सोनवणे ,डॉ.गजानन जाधव इत्यादी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.