• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, May 20, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

IPL 2022; तिसरा सामना पंजाब VS बेंगलोर दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन

by pravin
March 27, 2022
in आयपीएल, क्रिकेट
IPL 2022; तिसरा सामना पंजाब VS बेंगलोर दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

आयपीएल २०२२ ची सुरुवात २६ मार्च रोजी झाली. या हंगामातील तिसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ आमने सामने असतील. हा सामना रविवारी (२७ मार्च) मुंबईत खेळला जाणार आहे. पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील हा चालू हंगामातील पहिला सामना असून दोन्ही संघांना नवीन कर्णधार मिळाले आहेत. पंजाब किंग्जसाठी मयंक अगरवाल आणि आरसीबीसाठी फाफ डू प्लेसिस पहिल्यांदाचा कर्णधाराची भूमिका साकारणार आहेत. चला तर जाणून घेऊया पंजाब आणि आरसीबीच्या या सामन्याविषयी सर्वकाही

मागच्या हंगामात विराट कोहलीने आरसीबीचे नेतृत्व सोडण्याची घोषणा केली आणि संघाचे नेतृत्व करण्यासाठी आरसीबीने फाफ डू प्लेसिस  याला मेगा लिलावात खरेदी केले. मागच्या हंगामात सीएसकेसाठी त्याने जबरदस्त प्रदर्शन केले होते, पण आरसीबीने मेगा लिलावात बाजी मारून त्याला संघात सामील केले.

दुसरीकडे केएल राहुलने पंजाब किंग्जची साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद स्वीकारले. अशात पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाची जबाबदारी मयंक अगरवाल  याच्या खांद्यावर येऊन पडली. पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील आयपीएल २०२२ चा तिसरा सामना मुंबई स्थित डॉ. डी वाय पाटील स्टेडियममध्ये खेळला जाईल.भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७.३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी सांयकाळी ७ वाजता नाणेफेक होईल.

दोन्ही संघांची संभावित प्लेइंग इलेव्हन –
पंजाब किंग्ज –
मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, प्रभसिमरन सिंह/जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिविंगस्टोन, शाहरुख खान, भानुका राजपक्षे, ओडेन स्मिथ, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, राहुल चाहर आणि संदीप शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर –
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, अनुज रावत, शेरफेन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, हर्षल पटेल, वनिंदु हसरंगा, डेविड विली आणि मोहम्मद सिराज.

Tags: IPL 2022; Third match Punjab VS Bangalore See the potential playing XI of both the teamsipl2022
ShareTweetSend
Next Post
ICC Women's World Cup 2022: भारताचा ३ विकेट्सने पराभव;विश्वचषकातूनही बाहेर

ICC Women's World Cup 2022: भारताचा ३ विकेट्सने पराभव;विश्वचषकातूनही बाहेर

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.