पुणे | रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२मध्ये सलग पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. एमसीए स्टेडियमवर रंगलेल्या रंगतदार सामन्यात पंजाब किंग्जने मुंबईला १२ धावांनी मात दिली. नाणेफेक जिंकलेल्या रोहितने गोलंदाजी स्वीकारली. पंजाबने मुंबईला १९९ धावांचे तगडे आव्हान दिले आहे. शिखर धवन, मयंक अगरवाल यांनी अर्धशतके ठोकत पंजाबला उत्तम सुरुवात करून दिली. प्रत्युत्तरात मुंबईला २० षटकात १८६ धावांपर्यंतच पोहोचता आले. शेवटच्या काही षटकात मुंबईने महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि पंजाबने सामना हिसकावून घेतला.
मुंबईचा डाव
मुंबईचा कप्तान रोहित शर्माने इशान किशनसोबत चांगल्या लयीत सुरुवात केली. रोहितने ३ चौकार आणि २ षटकारांसह २८ धावा केल्या. पंजाबचा कप्तान मयंकने वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला चेंडू दिला. रबाडाने रोहितला फसवले आणि वैभव अरोराकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविस आणि तिलक वर्माने भागीदारी रचली. बेबी एबी ब्रेविसने राहुल चहरच्या एका षटकात ४ षटकार टोकत २८ धावा चोपल्या. ओडियन स्मिथने ब्रेविसला अर्धशतकाच्या आधीच तंबूत पाठवले. त्याने २५ चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ४९ धावा केल्या. ब्रेविसपाठोपाठ तिलक वर्मा (३६) आणि कायरन पोलार्ड (१०) धावबाद झाल्यानंतर सूर्यकुमारवर मोठी जबाबदारी आली. चांगल्या लयीत खेळताना तो १९व्या षटकात फसला. कगिसो रबाडाला मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने स्मिथकडे झेल दिला. सूर्यकुमारने एक चौकार आणि ४ षटकारांसह ४३ धावांची खेळी केलीय. शेवटच्या षटकात मुंबईला २२ धावांचे अंतर पार करता आले नाही. २० षटकात त्यांना ९ बाद १८६ धावांपर्यंतच पोहोचता आले. पंजाबकडून स्मिथने ३० धावांत ४ बळी घेतले.
कप्तान मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांनी पंजाबसाठी दणक्यात सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९७ धावांची भागिदारी रचली. पॉवरप्लेमध्ये दोघांनी मुंबईच्या सर्व गोलंदाजांवर हल्ला चढवला. मयंकने ६ चौकार आणि २ षटकारांसह ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. फिरकीपटू मुरुगन अश्विनच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात मयंक बाद झाला. त्यानंतर धवनने अर्धशतक पूर्ण केले. जॉनी बेअरस्टोला जास्त काही करता आले नाही. स्पर्घेत चांगल्या फॉर्मात असलेल्या लियान लिव्हिंगस्टोनचा (२) बुमराहने अप्रतिम त्रिफळा उडवला. त्यानंतर जितेश शर्मा आणि शाहरुख खान यांनी आक्रमक फटके खेळत संघाला दोनशे धावांच्या जवळ पोहोचवले. पंजाबने २० षटकात ५ बाद १९८ धावा केल्या. शाहरुखने ६ चेंडूत २ षटकारांसह १५ तर जितेशने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३० धावा केल्या. बेसिल थम्पीने मुंबईकडून २ बळी घेतले.
पंजाबचा डाव

Punjab Kings return to winning ways! 👏 👏
The Mayank Agarwal-led unit register their third win of the #TATAIPL 2022 as they beat Mumbai Indians by 12 runs. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/emgSkWA94g#TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/fupx2xD2dr
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
पंजाब किंग्ज – मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चहर, वैभव अरोरा, अर्शदीप सिंग.