आयपीएल मधील सामना क्रमाक ३५ मध्ये गुजरात समोर मुंबईचे आवाहन होते. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातच्या फलंदाजांनी हा निर्णय सपशेल अपयशी ठरविला. सलामी वीर सहा वगळता सर्व फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. गिल ने सर्वाधिक 56 धावा केल्या.
मिलर आणि मनोहर ने ही वेगवान प्रत्येकी 46 आणि 42 धावा केल्या. फलंदाजाच्या सुरेख फलंदाजीच्या बडावर गुजरातने वीस शतकात 207 धावांचा डोंगर उभा केला. तर मुंबईकडून चावला ने दोन तर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.धावांचा पाठलाग करीत असताना मुंबईची सुरुवात चांगली राहिली नाही कर्णधार शर्मा लवकर तंबूत परतला.
किशन आणि शानदार फार्मात असलेला वर्मा ही लवकर बाद झाला. ग्रीन आणि यादवने संघाचा डाव सावरला मात्र तेही मोठी संख्या करण्यात अपयशी ठरले. मुंबईकडून वाढेराने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर ग्रीन आणि यादवने प्रत्येकी 33 आणि 23 धावा केले. गोलंदाजी मध्ये नूर अहमदने मुंबईचे कंबर्डे मोडत सर्वाधिक तीन गडी बात केले. तर राशिद खान ने दोन व हार्दिक पांड्याने एक गडी बात केले.
आज कोलकाता समोर बेंगलोरचे आवाहन असणार आहे.