आज आयपीएल मध्ये एक सामना आहे या सामन्यांमध्ये हैदराबाद समोर चेन्नईचे आवाहन आहे. या सामन्यांमध्ये हैदराबाद समोर चेन्नईचे आवाहन आहे. या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा एकतर्फी सामन्यात धुवा उडविला आहे. चेन्नईचा कर्णधार धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गोलंदाजांनी कर्णधाराला निराश केले नाही. गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना कोणतीही संधी न देता विकेट्स प्राप्त केले. मात्र 34 धावा करणारा अभिषेक शर्मा हैदराबाद कडून टॉप स्कोरर ठरला. रवींद्र जडेजाने हैदराबादचे कंबरडे मोडत सर्वाधिक तीन गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करत असताना चेन्नईच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. कॉन्वेने सर्वाधिक 77 धावा केल्या. गायकवाड नेही 35 धावा केल्या. तर गोलंदाजी मध्ये फक्त मार्कंडे ने दोन गडी बात केल्या. चेन्नईने हैदराबादचा सात विकेट्स नी धुवा उडविला आहे.
तर उद्या आयपीएल मध्ये दोन सामने आहे. पहिल्या सामन्यात लखनौ समोर गुजरातचे तर दुसऱ्या सामन्यांमध्ये मुंबई समोर पंजाबचे आव्हान असणार आहे.