आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळविण्यात येणार आहे पहिल्या सामन्यात बैंगलोर समोर पंजाबचे आवाहन आहे. या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र बेंगलोरच्या सलामीवीरांनी पंजाबचा हा निर्णय अपयशी ठरविलाबैंगलोरच्या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकी खेळी केल्या.
डुप्लेसीने सर्वाधिक 84 तर कोहलीने 59 धावा केल्या. या दोघांच्या शानदार कामगिरीचा बडावर बेंगलोर ने 174 धावांचा डोंगर उभा केला. तर पंजाब कडून ब्र्रारणे सर्वाधिक दोन गडी बाद केले.
धावांचा पाठलाग करीत असताना पंजाब ची सुरुवात चांगली राहिली नाही. एकापाठोपाठ पंजाबचे महत्त्वाचे फलंदाज बाद होत गेले. प्रत सिमरन आणि जिथे शर्मा वगळता सर्व फलंदाज अपयशी ठरले. या दोघांनी प्रत्येकी 46-41 धावा केल्या. तर गोलंदाजी मध्ये सिराज ने पंजाबचे कंबरडे मोडत सर्वाधिक चार गाडी बाद केले. व्यशाकनेही दोन गडी बाद करत शिराजला चांगली साथ दिली.
बैंगलोर ने 24 धावांनी पंजाबचा पराभव केला.