नाशिक (प्रतिनिधी): १२० कोटी लोकसंख्याचा आपला तरुण भारत देश ऑलिम्पिक मध्ये विविध खेळात पदक जिंकन्याचे स्वप्न बघतो आहे. तर दुसरीकडे त्याच क्षेत्रातील पदवीधर B.P.E, B.P.Ed, M.P.Ed लोक बेरोजगार म्हणून सरकार कडे नोकरी साठी संघर्ष करत आहेत. किती शोकांतिका आहे. आतापर्यंत जितक्या खेळाडू ने ऑलंम्पिक मध्ये देशाला पदक जिंकून दिले त्यांनी पण आपल्या खेळाची पहिली सुरुवात आपल्या शाळेतूनच केली असेल तेव्हा त्याला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, भूगोल, समाजशास्र च्या मास्तरांनी नसेल सांगितलं की, तुझं खेळात करियर होऊ शकत व तू पुढे जाऊन देशाकडून खेळू शकतो.
त्याचे ते कौशल्य फक्त त्या शाळेतील क्रीडा शिक्षकानेच ओळखलं असेल आणि नंतर त्याला साई, क्रीडा प्रभोधनी, किंवा अजून एखाद्या सरकारी किंवा खाजगी क्रीडा प्रशिक्षण केंद्रात पाठवले असेल. आणि नंतर त्या खेळाडूंच्या यशाचे सर्व श्रेय त्या प्रशिक्षण केंद्राला व तेथील मार्गदर्शक ( कोच ) ला जाते आणि इथंच क्रीडा शिक्षकांचा दर्जा खालवतो. आणि वरून सरकार म्हणते की, आता खेळाडू पण क्रीडा शिक्षक म्हणुन काम करू शकतो. यामध्ये मला फक्त सरकार एकच सांगायचं की, एक यशस्वी खेळाडू त्याच्या खेळाचा चांगला कोच बनू शकतो पण क्रीडा शिक्षक नाही बनू शकत कारण त्याला फक्त आणि फक्त त्याच्याच खेळाचे ज्ञान असते.

बाकी दुसऱ्या खेळाचे त्याला काहीच माहित नसते जर त्याला क्रीडा शिक्षक बनायचे असेल तर B.P.E, B.P.Ed, M.P.Ed च करावे लागते. कारण इथं तुम्हाला 2 वर्षात कमीत कमी 20 ते 25 खेळाचे सखोल असे ज्ञान दिले जाते. आणि हेच B.P.E B.P.Ed, M.P.Ed करण्याचं खरं कारण आहे.
क्रीडा शिक्षकांची शाळेतील काही महत्वाची कामे
1) शाळेतील सर्व विद्यार्थीच्या आरोग्याची काळजी घेणे.
2) शाळेत शिस्तीचे वातावरण निर्माण करणे.
3) शाळेत विद्यार्थीना विविध खेळाचे प्रशिक्षण देणे.
4) विद्यार्थी मधील सुप्त गुण ओळखून त्याला त्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी चालना देणे.
5) विद्यार्थी मध्ये खेळाच्या माध्यमातून देश प्रेम निर्माण कारणे.