आज आयपीएल मध्ये दोन सामने खेळविण्यात आले आहे यामध्ये दुसऱ्या सामन्यात राजस्थान समोर हैदराबादच्या आव्हान आहे राजस्थानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला राजस्थानच्या सलामीवीरांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली.
बटलरने 95 तर सॅमसन ने 66 धावांचे योगदान दिले. जयस्वालने ही 35 धावांचे योगदान दिले. फलंदाजाच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर राजस्थानी धावांचा डोंगर उभा केला. जान्सेन आणि भुवनेश्वर ने प्रत्येकी एक गडी बाद केला.
विशाल धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादच्या फलंदाजांनी संघाला आवश्यक अशी सुरुवात करून दिली. सर्व फलंदाजांनी चांगली कामगिरी करत संघाच्या विजयाला हातभार लावला. अभिषेक शर्माने सर्वाधिक 55 धावा केल्या. त्रिपाठी ने 47 धावा केल्या.
शेवटच्या चेंडूवर चार धावांची आवश्यकता असताना अब्दुल समदणे षटकार खेचत संघाला विजय मिळवून दिला. व बटलर आणि सहल च्या मेहनतीवर पाणी फेरले. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक चार गाडी बाद केले.