कमी धावसंख्येतही बेंगलोर ने उडविला लखनऊचा धुवा.

बेंगलोर ने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला

आज आयपीएलच्या एक हाजार एकव्या  सामना खेळविण्यात आला यामध्ये बेंगलोर समोर लखनऊचे आवाहन आहे. नाणेफेक जिंकून बेंगलोर ने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डुप्लेसी आणि कोहलीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र या दोघांनंतर कोणत्याही फलंदाजाने चांगली कामगिरी केल्या नसल्यामुळे बेंगलोरला 20 षटकात मात्र 126 धावापर्यंतच मजल मारता आली. डुप्लेसीने सर्वाधिक 44 तर कोहलीने 31 धावा केल्या. बेंगलोरच्या तब्बल आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

लखनऊ कडून नवीन हकने सर्वाधिक तीन गडी बात केले. तर मिश्रा व बिष्णोई नेही प्रत्येकी दोन गडी बाद केले.धावांचा पाठलाग करीत असताना लखनऊची सुरुवात चांगली राहिली नाही. सिराजणे पहिल्याच षटकार विस्फोटक फलंदाज मेयर्सला तंबूत पाठवले.

तर राहुल जायबंदी झाल्यामुळे तो फलंदाजीसाठी सर्वात शेवटी आला. 127 धावांचा पाठलाग करण्यातही लखनऊ संघ अयशस्वी ठरला. मात्र 23 धावा करणारा गौतम संघाकडून टॉप स्कोरर ठरला. हेजल वुड आणि शर्माने प्रत्येकी दोन गडी बात केल्या. तर उर्वरित सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात बेंगलोर ने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला.

You might also like

Comments are closed.