छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): डॉजबाॅल स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने डॉजबाॅल असोसिएशन सोलापूर व एम के फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2 री सिनियर राज्यस्तरीय डाॅजबाॅल स्पर्धा पुरुष व महिला स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम प्रसंगी महादेव कोगनुरे मुख्य व्यवस्थापक सागर सिमेंट महाराष्ट्र ,गोवा. व संस्थापक अध्यक्ष एम के फाउंडेशन यांच्या शुभहस्ते , वैजिनाथ हत्तुरे उपाध्यक्ष सॉफ्टफुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे संचालक धरेप्पा हत्तुरे ,सोलापूर जिल्हा जिम्नॅस्टिक व टेनिस व्हॉलीबॉल चे जिल्हाध्यक्ष कार्तिक चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते उपाध्यक्ष दि इंडियन डाॅजबाॅल फेडरेशन व सचिव डाॅजबाॅल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र प्रा. एकनाथ साळुंके,सहसचिव प्रा. रमेश शिंदे जालना , क्रीडा अधिकारी सत्तेन जाधव, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, परमेश्वर मोने उद्योगपती, कुलदीप सावंत , विजय मोटघरे वाशिम ,जिल्हा सचिव सुरेश गांधी ठाणे , निहाल शिकलगार कोल्हापूर ,निवड समिती सदस्य राकेश बनसोडे नागपूर ,मयुरी गायके संभाजीनगर ,तांत्रिक समिती चेअरमन डी आर खैरनार ,पंच प्रमुख मयूर रकटे पाटील,मयूरी गायके, सागर तांबे, प्रा.रमेश शिंदे, वैभव किरगत, दिपाली काळे, निखिल मस्के, रविराज आढे, वैभव चव्हाण, प्रबुद्ध चिंचोलीकर सोलापूर,नागप्पा मैंदर्गी, प्रा.संतोष गवळी, धरेप्पा हत्तुरे संचालक हे उपस्थित होते
तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉजबाॅल असोसिएशन सोलापूरचे अध्यक्ष जवानसिंग राजपूत,डॉजबाॅल असोसिएशन सोलापूरचे सचिव व स्पर्धा सचिव प्रा.संतोष खेंडे, गंगाराम घोडके, सुहास छंचुरे मारुती घोडके, राजाराम शितोळे, दत्तात्रेय पाटील ,श्रीधर गायकवाड, प्रशांत राणे ,राहुल हजारे ,शरण वांगी अतुल गवळी ,धर्मराज कट्टीमनी , यांनी परिश्रम घेतले.
अंतिम निकाल
पुरुष
प्रथम संभाजीनगर
द्वितीय जालना
तृतीय अमरावती
महिला
प्रथम संभाजीनगर
द्वितीय वाशिम
तृतीय सोलापूर