• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, July 13, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

खेलो इंडिया युथ गेम्स 2021; महाराष्ट्राला दोन सुवर्णांसह १० पदके

by pravin
June 8, 2022
in अन्य खेळ, खेलो इंडिया यूथ गेम्स, बातम्या
खेलो इंडिया युथ गेम्स 2021; महाराष्ट्राला दोन सुवर्णांसह १० पदके
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

पंचकुला (प्रतिनिधी): खेलो इंडिया स्पर्धेत आज महाराष्ट्राच्या संघाने २ सुवर्ण, ३ रौप्य व ५ कांस्य पदके पटकावली. कुस्ती, अॅथलेटिक्स, मल्लखांब, जलतरण, वेटलिफ्टिंगमधील पदकांचा यात समावेश आहे.ताऊ देवीलाल स्टेडियमसह संपूर्ण क्रीडा वर्तुळाच्या नजरा महाराष्ट्राच्या परफॉर्मन्सवर लागल्या आहेत. महाराष्ट्र आणि हरियानात पहिल्या क्रमांकासाठी चढाओढ आहे. महाराष्ट्राला उद्या होणाऱ्या जलतरण, मल्लखांब, अॅथलेटिक्समधील पदकांची आशा आहे.

आज जलतरण – बटरफ्लाय – आर्यन वर्णेकर (कांस्यपदक,लिंब, सातारा), ८०० मीटर फ्रीस्टाईल – आन्या वाला (रौप्य, मुंबई). अॅथलेटिक्स – १०० मीटर हर्डल्स – प्रांजली पाटील (कांस्य, मुंबई), ट्रिपल जंप – पूर्वा सावंत -सुवर्णपदक.
मल्लखांब – रौप्य (एक सांघिक उपविजेतेपद). प्रणाली मोरे (सातारा, भक्ती मोरे (सातारा), पलक चुरी (मुंबई), हार्दिका शिंदे (मुंबई), आरूषी शिंघवी (अमरावती), तमन्ना संघवी (मुंबई) या मुलींचा मल्लखांबचा संघ आहे. त्यांनी उपविजेतेपद मिळवले. वेटलिफ्टिंग – ७६ किलो वजनगट – प्रतीक्षा कडू (क्रीडा प्रबोधिनी, पुणे).

कुस्तीत मुला-मुलींच्या संघांनी आज सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले. हरियानाने दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावले. तर दिल्ली तिसऱ्या स्थानावर राहिली. ५५ किलो फ्रीस्टाईल वजन गटात वैभव पाटीलने (रा. बानगे, कोल्हापूर) सुवर्णपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात कल्याणी गादेकर हिने रौप्य पदक मिळवले. ६५ किलो वजनगटात पल्लवी पोटफोटे (वडगाव दरेकर, दौंड, पुणे) हिने कांस्य पदकावर नाव कोरले.

नंबर वनसाठी चढाओढ

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत प्रथम क्रमांसाठी हरियाना आणि महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे. कधी महाराष्ट्र तर कधी हरियाना पुढे जात आहे. काल महाराष्ट्र पहिल्या (२४, २४, १४ एकूण ६६) तर हरियाना दुसऱ्या क्रमांकावर (२३, २०, २९ एकूण ७२) होता. आज कुस्ती आणि अॅथलेटिक्समधील पदकांमुळे ही आकडेवारी बदलली. तो पुन्हा पहिल्या क्रमांकावर (३०, २३, ३४ एकूण ८७) तर महाराष्ट्र (२६, २५, २२ एकूण ७३) विराजमान झाला आहे. (रात्री पावणे आठ वाजताची ही आकडेवारी आहे.)

Tags: khelo india youth games 2021khelo india youth games 2021 Marathi Newskhelo india youth games 2021 NewsMaharashtra won 10 medals including two golds
ShareTweetSend
Next Post
खेलो इंडिया युथ गेम्स2021;खो-खो संघांचे आजही डावाने विजय यजमान हरियानावर पराभवाची नामुष्की

खेलो इंडिया युथ गेम्स2021;खो-खो संघांचे आजही डावाने विजय यजमान हरियानावर पराभवाची नामुष्की

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथे अस्मिता खेलो इंडिया वुमन्स सायकलिंगचे आयोजन

राष्ट्रीय शालेय क्रीडास्‍पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा;छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, नाशिक संघास विजेतेपद

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गुणवंत राष्ट्रीय खेळाडूंच्या मातांचा गौरव

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.