खेलो इंडिया युथ गेम्स2021; मल्लखांबमध्ये मुलांना सांघिक विजेतेपद ज्युदोमध्ये मिथिला भोसलेचा सुवर्णपंच

पंचकुला (प्रतिनिधी): खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लखांबच्या खेळाडूंनी केलेल्या चित्तथराक कसरती संघाला सुवर्णपदक देऊन गेल्या. दोन दिवसांपूर्वी मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. प्रारंभीपासून महाराष्ट्राची मदार मल्लखांबच्या संघावर होती. परंतु मुलींच्या संघाला रौप्यपदक मिळाल्याने महाराष्ट्र तालिकेत एक पदकाने हरियानाच्या मागे आहे. आज दुसरे सुवर्ण पदक ज्युदोमध्ये मिळाले. ४० किलो वजन गटात मिथिला भोसले हिने ही सुवर्ण कामगिरी केली. ती मूळ ठाण्याची असून सध्या बालेवाडी येथे ज्युदो अकादमीत सराव करते. तिने गुजरातच्या अर्चना नागेरा हिच्यावर विजय मिळवला.

खेलो इंडिया युथ गेम्स2021; मल्लखांबमध्ये मुलांना सांघिक विजेतेपद ज्युदोमध्ये मिथिला भोसलेचा सुवर्णपंच

प्रशिक्षक मधुश्री देसाई-काशीद, मंगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मिथलाचा सराव सुरू असतो. मंगेश भोसले हे तिचे वडील आहेत.मुलांच्या मुल्लखांबच्या संघाला मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या संघांकडून कडवे आव्हान मिळाले. ०.५ गुणांनी महाराष्ट्राचा संघ विजेता ठरला. महाराष्ट्राच्या विजेत्या संघाला १२६.४५ गुण मिळाले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मध्य प्रदेशने १२६.४० गुणांपर्यंत कडवी झुंज दिली. तिसऱ्या स्थानावर राहिलेला छत्तीसगडचेही १२४. ५० गुण होते.

महाराष्ट्राच्या संघाने रोप, पोल आणि हँगिंग या प्रकारात कसरती केल्या.

महाराष्ट्राच्या संघाने रोप, पोल आणि हँगिंग या प्रकारात कसरती केल्या.

या संघामध्ये अवधूत पिंगळे (मुंबई), ऋषभ गुगळे (मुंबई), अथर्व कोंडविलकर (मुंबई), चेतन मानकर (नाशिक), मुग्रान पाठारे (मुंबई), अमेय सूर्ववंशी (पुणे) यांचा समावेश होता. रात्री आणि उद्या (शनिवारी) मल्लखांबचे वैयक्तिक क्रीडा प्रकार होणार आहेत, अशी माहिती प्रशिक्षक अनिल नागपुरे यांनी दिली. त्या प्रकारातही महाराष्ट्राला सुवर्णपदकांची आशा आहे.

मुलींच्या संघाने सांघिक उपविजेतेपद पटकावले होते. त्या संघात आरूषी शिंगवी, तमन्ना संघवी, प्रणाली मोरे, भक्ती मोरे, हार्दिका शिंदे, पलक सुरी यांचा समावेश होता. मुलींच्या संघाच्या काजल काळे या प्रशिक्षक आहेत.

You might also like

Comments are closed.