खेलो इंडिया युथ गेम्स2021;खो-खो संघांचे आजही डावाने विजय यजमान हरियानावर पराभवाची नामुष्की

पंचकुला(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या खो-खो संघांची दुसऱ्या दिवशीही विजयी आगेकूच कायम राहिली. अगोदर मुलांच्या संघाने हरियानावर एकतर्फी (एक डाव ४ गुण) मात केली. नंतर मुलींनीही डावाने (एक डाव १ गुण) विजय संपादन केला. दोन्ही संघांकडून यजमान हरियानाला फॉलोऑन मिळाला. सलामीच्या सामन्यातच ही नामुष्की त्यांच्यावर ओढावली.
येथील ताऊ देवीलाल स्टेडियमध्ये हे सामने सुरू आहेत. बलाढ्य महाराष्ट्राच्या संघांच्या सामन्यांवर सर्वांच्या नजरा आहेत. ओडिसा राज्याचे दोन्ही संघ महाराष्ट्रापुढे या स्पर्धेत आव्हान निर्माण करू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या मुलांनी आक्रमण करीत हरियानाच्या संघाची धूळधाण उडवली. त्यांचे तब्बल १५ गडी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी बाद केले. सुफियान शेखने आणि रोहन कोरे यांनी हरियानाची सुरूवातीची फळी कापून काढली. दोघांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
हरियाना आक्रमण करतानाही गोंधळून गेला होता. त्यांना पहिल्या डावात महाराष्ट्राचे केवळ ४ गडी बाद करता आले. दुसऱ्या डावात त्यांनी आक्रमणाची धार वाढवली होती. त्यामुळे सात गड्यांपर्यंतच त्यांचा स्कोर गेला. दोन्ही डावांत मिळून त्यांना ११ गडी बाद करता आले. परिणामी महाराष्ट्राचा संघ एक डाव ४ गुणांनी विजयी ठरला. किरण वसावे याने २ मिनिट ३० सेकंद संरक्षण करीत किल्ला लढवला. नरेंद्र कातकडेनेही २ मिनिट बाजू लावून धरली. आदित्य कुदळे १ मिनिट आणि १० सेकंद संरक्षणाची धुरा सांभाळीत नाबाद
मुलींच्या आक्रमणाने हरियाना घायाळ
मुलींच्या संघानेही यजमान हरियानाच्या संघाला चांगलेच घायाळ केले. महाराष्ट्राच्या अतिक्रमणानापुढे त्यांचा निभाव लागला नाही. सुरूवातीला हरियानाने निकराची लढत देण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्राच्या मुलींनी आक्रमण तीव्र करीत त्यांचे ११ गडी बाद केले.
हरियानाचे आक्रमणही महाराष्ट्राच्या मुलींनी परतून लावले. पाचच खेळाडूंनी त्यांचा घाम काढला. परिणामी फॉलोऑनची नामुष्की ओढवलेला हरियाना पिछाडीवर गेला. त्यांना दोन्ही डावात अवघे १० गडी बाद करता आले. अश्विनी शिंदेने २ दोन मिनिट, जान्हवी पेठेने २ मिनिट, संपदा मोरेने दीड मिनिट नाबाद आणि दुसऱ्या डावात २ मिनिट ४० सेकंद संरक्षण केले.
आक्रमणात अश्विनी शिंदे, संपदा मोरे व ऋषालीने प्रत्येक दोन दोन गडी बाद केले. दीपाली राठोड, जान्हवी पेठे यांनीही चांगला खेळ
Comments are closed.