• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Wednesday, November 18, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home खेळ ( सांघिक ) खो-खो

खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका; विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!

by pravin
October 4, 2022
in खो-खो, नॅशनल गेम्स
0 0
खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका; विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!
Share on FacebookShare on Twitter

अहमदाबाद- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद वर्चस्व गाजवत महाराष्ट्राच्या खोखो खेळाडूंनी दुहेरी सुवर्णपदकाची भेट देऊन विजयादशमीचा आनंद द्विगुणित केला.

संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या अंतिम लढतीत महिला गटात महाराष्ट्र संघाने ओडिशा संघावर डावाने विजय साकारत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र महिला खोखो संघाने 18-8 असा एक डाव व 10 गुणांनी ओडिशा संघाचा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून रुपाली बडे हिने 3 मिनीटे संरक्षण करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. प्रियांका भोपी हिने अष्टपैलू कामगिरी नोंदवली. प्रियांका भोपी हिने 2.50 आणि 3.50 मिनीटे पळतीचा खेळ केला आणि 2 गुण देखील मिळवले. प्रियांका इंगळे हिने 1.50 मिनीटे संरक्षणाचा उत्कृष्ट खेळ केला.

तसेच तिने 8 गुण मिळवून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. रेश्मा राठोड हिने 2.50 मिनीटे संरक्षण केले. रुपाली बडे हिने 3 मिनीटे पळतीचा खेळ करुन सर्वांचीच वाहवा मिळवली. अपेक्षा सुतार हिने 1.40 मिनीटे संरक्षण केले व दोन गुण देखील मिळवले. संपदा मोरे हिने 1.20 मिनीटे नाबाद संरक्षण केले. ऋतुजा खरे हिने दोन गुण मिळवले. ओडिशाकडून निकिता साहू, शुभाश्री व मागी माझी यांनी अष्टपैलू कामगिरी बजावली.

पुरुष गटात महाराष्ट्र संघाने केरळ संघाविरुद्ध आक्रमक खेळत सुवर्णपदक जिंकले. महिला गटाप्रमाणेच महाराष्ट्राचा पुरुष संघ डावाने जिंकतो की काय याची मोठी उत्सुकता होती. मात्र, महाराष्ट्र संघाने केरळचा चुरशीच्या लढतीत सात मिनीटे राखून व 4 गुणांनी (30-26) विजय साकारत गोल्ड पटकावले.

महाराष्ट्राच्या सर्वच खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी ठरली. अक्षय भांगरे याने 2 मिनीटे व 1.10 मिनीटे संरक्षण केले. रामजी कश्यप याने 1.30 मिनीटे व 2 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. ह्रषिकेश मुर्तावडे याने अष्टपैलू कामगिरी बजावली. त्याने 1.40 व 1.30 मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला व 6 गुण मिळवून संघाच्या सोनेरी यशात मोलाचा वाचा उचलला. सुरेश गरगटे याने 1.20 मिनीटे संरक्षण केले व 14 गुण घेऊन संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. प्रतिका वाईकर याने 1.20 मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने 4 गुण मिळवले. केरळकडून निहाल, श्रीजेश व अभिराम यांनी झुंज दिली.

खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका; विजयादशमीनिमित्त महिला व पुरुष संघांनी लुटले सुवर्ण!

सुवर्ण भेट- शीतल भोर
महाराष्ट्रातील तमाम खोखो आणि क्रीडा प्रेमींना विजयादशमीनिमित्त सुवर्ण पदकाची भेट देता आली यापेक्षा दुसरा आनंद नाही. अंतिम सामन्यात ओडिशा संघाला डावाने हरवून सुवर्ण पदक जिंकू असा विश्वास होताच आणि प्रत्यक्षात सामना डावाने जिंकून आम्ही गोल्ड जिंकले याचा मोठा आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया महिला खोखो संघाची कर्णधार शीतल भोर हिने व्यक्त केली.
शीतल भोर म्हणाली की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेपूर्वी खोखो संघाचा 15 दिवसांचे सराव शिबिर घेण्यात आले. या सराव शिबिरात अधिक प्रभावी पद्धतीने सराव करुन घेण्यात आला. तसेच आम्हाला अतिशय चांगल्या सुविधा देण्यात आल्या. संघात दर्जेदार व अनुभवी खेळाडू असल्याने आमचा संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होताच. संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी यांनी आमचे मनोबल वाढवले. या सर्वांचा परिपाक म्हणजेच आम्ही मिळवलेले हे सुवर्णपदक आहे, असे शीतल भोर हिने सांगितले.

सुवर्ण जिंकण्याचेच ध्येय होते – ह्रषिकेश मुर्तावडे
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आम्ही सुवर्ण पदक जिंकण्याचेच ध्येय घेऊन आलो होतो. सराव शिबिरात आणि या स्पर्धेत आम्ही जे डावपेच आखले होते. त्यानुसार खेळ केला आणि अपेक्षेप्रमाणे गोल्ड जिंकले. संघातील सर्व 15 खेळाडूंचा समन्वय व ताळमेळ अतिशय सुरेख होता. संघात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडू असल्याने आमचा संघ विजेतेपदाचा दावेदार होता आणि आम्ही सर्वांचा विश्वास सार्थ ठरवत गोल्ड जिंकले याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रशिक्षक शिरीन गोडबोले सरांनी ज्या पद्धतीने आम्ही खेळ करावयाचा हे सांगितले होते. त्यानुसार आमचा स्पर्धेतील खेळ झाला आणि गोल्डवर आम्ही शिक्कामोर्तब केले. विजयादशमीची खोखो आणि महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींना आम्ही सुवर्णपदकाची भेट देऊ शकलो यापेक्षा दुसरा आनंद नाही असे ह्रषिकेश मुर्तावडे याने सांगितले.

दोन सुवर्णाची खात्री होती- गोविंद शर्मा
महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांची स्पर्धेपूर्वीची तयारी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रत्येक सामन्यात त्यांनी गाजवलेले वर्चस्व पाहता दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील याची मला खात्री होती. अंतिम सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करुन गोल्डन धमाका केला याचा मोठा आनंद आहे. सर्व खेळाडू याचे हकदार आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र खोखो संघटनेचे सरचिटणीस गोविंद शर्मा यांनी व्यक्त केली.

गोल्डन धमाका-  चंद्रजीत जाधव
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवली. या स्पर्धेत दोन्ही संघ अप्रतिम खेळले आहेत. जवळपास प्रत्येक सामने त्यांनी डावाने वा अधिक फरकांनी जिंकले आहेत. साहजिकच अंतिम सामन्यात दोन्ही संघ गोल्ड जिंकतील याची खात्री होती आणि अपेक्षेप्रमाणे दोन्ही संघ अंतिम सामन्यात जबरदस्त खेळले आणि गोल्ड जिंकले अशी प्रतिक्रिया भारतीय खोखो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राचा महिला खोखो संघ-

प्रियांका भोपी, प्रियांका इंगळे, ऋतुजा खरे, शीतल भोर, श्वेता वाघ, अपेक्षा सुतार, रेश्मा राठोड, रुपाली बडे, आरती कांबळे, गौरी शिंदे, पूर्वा मडके, जान्हवी पेठे, मयुरी पवार, दीपाली राठोड, संपदा मोरे. कोच – प्रवीण बागल, व्यवस्थापक रत्नराणी कोळी, कोच प्राची वाईकर.

महाराष्ट्राचा पुरुष खोखो संघ-

राहुल मंडल, सागर पोतदार, अविनाश देसाई, मिलिंद कुरपे, अक्षय भांगरे, रामजी कश्यप, ह्रषिकेश मुर्चावडे, सुयश गरगटे, सुरज लांडे, अक्षय मिसाळ, प्रतिक वाईकर, लक्ष्मण गावस, धीरज सेनगर, निहार दुबळे, विजय शिंदे. कोच – शिरीन गोडबोले, संघ व्यवस्थापक कमलाकर कोळी, डॉ. अमित रावटे

Tags: 36th National Games36th National Games Maharashtra men's kho-Kho News36th National Games Maharashtra women's kho-Kho News36th National Sports Tournament News

pravin

Related Posts

महाराष्ट्र बॉक्सिंग च्या इतिहासातील एक वेगळेच यश शिवाजी महाराजांच्या कळातील एक पुनरावृत्ती गड आला पण सिंह गेला
नॅशनल गेम्स

…तर महाराष्ट्राचे सुवर्णपदक हुकले असते!!

October 13, 2022
महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी विजयादशमीला भेदले पदक
धनुर्विद्या

महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी विजयादशमीला भेदले पदक

October 5, 2022
महाराष्ट्र संघाला एअर पिस्तूल मिश्र गटात कांस्य
नेमबाजी

महाराष्ट्र संघाला एअर पिस्तूल मिश्र गटात कांस्य

October 4, 2022
पुठ्ठे गोळा करुन कुटुंबाला मदत करणारा खो-खो मधील हिरा रामजी कश्यप
खेळाडू

पुठ्ठे गोळा करुन कुटुंबाला मदत करणारा खो-खो मधील हिरा रामजी कश्यप

October 4, 2022
स्टीपलचेस शर्यतीत कोमल जगदाळेला रौप्य पदक
ॲथलेटिक्स

स्टीपलचेस शर्यतीत कोमल जगदाळेला रौप्य पदक

October 4, 2022
टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर व ऋतुजा भोसले यांना महिलांच्या दुहेरीत सुवर्ण पदक
लॉंग टेनिस

टेनिस मध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकर व ऋतुजा भोसले यांना महिलांच्या दुहेरीत सुवर्ण पदक

October 4, 2022
Load More
Next Post
नॅशनल गेम्स २०२२; तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला 5 पदके

नॅशनल गेम्स २०२२; तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राला 5 पदके

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026

indian xxx video film telegram ✓ Discover Top Indian Adult Content Channels

February 15, 2025

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 18, 2026
पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी

पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी

November 18, 2026
आशियाई ३-अ-साईड व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या नऊ खेळाडूंची भारतीय संघात निवड

आशियाई ३-अ-साईड व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगरच्या नऊ खेळाडूंची भारतीय संघात निवड

November 18, 2026
पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Boxing
  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी साठेला सुवर्ण; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

November 18, 2026
पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी

पहिल्या डावातील आघाडीवर छत्रपती संभाजीनगर विजयी

November 18, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In