महाराष्ट्र संघाला एअर पिस्तूल मिश्र गटात कांस्य

अहमदाबाद- युवा नेमबाज समर्थ मंडलिक आणि रुचिता विनेरकरने महाराष्ट्र संघाला 36 व्या स्पर्धेमध्ये नेमबाजीत तिसरे पदक मिळवून दिले. या दोघांनी एअर पिस्तूल मिश्र गटात कांस्यपदक आपल्या नावे केले.
यासह राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्य नावे नेमबाजी मध्ये तिसरे पदक नोंद झाले आहे. स्पर्धेत रुद्रांश पाटीलने नेमबाजी पहिले सुवर्णपदक जिंकले.. त्या पाठोपाठ अभिज्ञा पाटीलने कांस्य पदकावर नाव कोरले.
हीच लय कायम ठेव समर्थ आणि रुचिताने कांचे पदक जिंकले. महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय नियमात स्वप्नील कुसाळे आपल्या गटात चौथ्या स्थानावर राहिला.
Comments are closed.