महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी विजयादशमीला भेदले पदक

अहमदाबाद- आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, प्रथमेश जवकर, प्रथमेश फुगे आणि पार्थ कोरडे यांनी अचूक नेम धरून विजयादशमीला महाराष्ट्र संघासाठी कांस्यपदकाचे लक्ष भेदले. महाराष्ट्र पुरुष संघ 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत तिरंदाजीच्या कंपाउंड संगीत प्रकारात कांस्य पदकाचा मानकरी ठरला. यासह महाराष्ट्राने तिरंदाजीच्या इव्हेंट मध्ये पदकाचे खाते उघडले. बुधवारपासून राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिरंदाजीच्या इव्हेंटला सुरुवात झाली.

सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये महाराष्ट्र संघाने सर्वोत्तम सुरुवात करत पदकाचा प्रवेश निश्चित केला. दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवत महाराष्ट्र संघाने कांस्यपदक आपल्या नावे केले.

पदकाने संघाची सुरुवात : प्रशिक्षक रोकडे

महाराष्ट्राच्या पुरुष संघाने तिरंदाजी प्रकारात पदकाचे खाते उघडले आहे. यासह महाराष्ट्र संघाला पदकाने इव्हेंट मध्ये दमदार सुरुवात करता आली. याच पदकाने युवा खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे या इव्हेंटमध्ये दबदबा कायम राहत संघाच्या नावे मोठ्या संख्येत पदकाची निश्चिती होईल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक शुभांगी रोकडे यांनी व्यक्त केला.

 

You might also like

Comments are closed.