ऋतिका आणि ईशा यांचा डायव्हिंगमध्ये दुहेरी धमाका

राजकोट- डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकून लागोपाठ दुसरे विजेतेपद मिळवले. याआधी या स्पर्धेत तिने तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. याच प्रकारात ब्रॉंझपदक जिंकणाऱ्या ईशा वाघमोडे हिने हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारातही ब्रॉंझपदकाची कमाई केली.

ऋतिका हिने नवी दिल्ली येथे सन २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आजपर्यंत तिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत. तिला राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविले आहे. तिची सहकारी ईशा हिने २०१६ मध्ये झालेल्या दक्षिण आशियाई

स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती. त्याखेरीज तिने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर भरघोस पदकांची कमाई केली आहे.

You might also like

Comments are closed.