वैष्णवी आडकर व ऋतुजा भोसले यांनी महिलांच्या दुहेरीत सनससनाटी विजेतेपद पटकाविले. ऋतुजा हिने अर्जुन कढे याच्या साथीत मिश्र दुहेरीत अंतिम फेरी गाठली. कढे याने पुरुषांच्या एकेरीतही अंतिम फेरीकडे वाटचाल केली.
आडकर व भोसले यांनी दुहेरीच्या अंतिम फेरीत शर्मदा बालू व सोहा सादिक या कर्नाटकच्या जोडीला ६-४,६-४ असे सरळ दोन सेट्स मध्ये पराभूत केले. त्यांनी दोन्ही सेट्स मध्ये परतीचे खणखणीत फटके आणि अचूक सर्विसेस असा बहारदार खेळ केला. ऋतुजा हिने अर्जुनच्या साथीत गुजरातच्या वैदेही चौधरी व माधवन कामथ यांचा ६-३, ६-२ असा सरळ लढतीत पराभव केला आणि अंतिम फेरी गाठली. या जोडीने ताकदवान फटक्यांबरोबरच बिनतोड सर्व्हिसचा कल्पकतेने उपयोग केला.
ऋतुजा हिने महिलांच्या एकेरीतील उपांत्य फेरीत झील देसाई विरुद्धच्या सामन्यात पहिल्या सेट नंतर माघार घेतली. पहिला सेट देसाई हिने ६-० असा एकतर्फी जिंकला होता. पुरुषांच्या एकेरीत आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन याने कर्नाटकच्या प्रज्वल देव याच्यावर संघर्षपूर्ण लढतीनंतर ७-५,७-५ असा विजय मिळवला आणि अंतिम फेरी गाठली.