छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): चंदीगड ( पंजाब) येथे पंजाब विद्यापीठात दिनांक 5 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ रवाना झाला.
28 मार्च ते 2 एप्रिल 2023 दरम्यान विद्यापिठात या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षण सराव शिबीर प्रा.डॉ.पंढरीनाथ रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या संघाना स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी छावणी NCC विभागाचे राजेंद्र सिंग, विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.फुलचंद सलामपुरे, छत्रपती संभाजी नगर जिल्हा योग संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, प्रा.डॉ.पंढरीनाथ रोकडे, प्रा.डॉ.सचिन पगारे व्होलीबॉल प्रशिक्षक अभिजित दिक्कत, यांच्यासह मान्यवर उपास्थित होते. विद्यापीठाच्या या संघाला, विद्यापीठाचे कुलसचिव
प्रोफेसर डॉ.भगवानराव साखळे,क्रीडा संचालक डॉ.दयानंद कांबळे, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव गोकुळ तांदळे, प्रा डॉ.उदय डोंगरे, प्रा.डॉ.संदीप जगताप, गणेश बेटूदे,आदि मान्यवरांनी खेळाडूना शुभेच्छा दिल्या आहेत.
संघ पुढीलप्रमाणे
संतोष आवचार,रोहीत तुपारे,हर्षल रोकडे,रोहीत शेळके,दीपक भावकर, सुमेरसिंग पाटील,अक्षय चव्हाण, आकाश राऊत, बलराम जगताप, प्रेम खंडागळे,विजय मिसाळ, यशराज वाघ,रोहीत साळवे,कुणाल चव्हाण, शोएब पठाण ,मनीष पहाडिया. संघ प्रशिक्षक म्हणून डॉ. पंढरीनाथ रोकडे व व्यवस्थापक म्हणून सत्यजित पगारे , प्रा.रवींद्र खरात ह्याचे संघाला मार्गदर्शन लाभत आहे