भारतीय कुस्ती क्षेत्रातील वाद पुन्हा एकदा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. वरिष्ठ भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात उपोषणाचे हत्यार उपसले असून, त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्याची मागणी केली आहे. ऑलम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया व राष्ट्रकुल पदक विजेती विनेश फोगट हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत.
जानेवारी महिन्यात याच कुस्तीपटूंनी दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन केले होते. बृजभूषण सिंह हे महासंघात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच त्यांनी अनेक महिला कुस्तीपटूंचे लैंगिक केल्याचा आरोप देखील त्यांनी लावलेला. सिंग यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर या प्रकरणात दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिचा समावेश असलेली एक सदस्यीय समिती क्रीडा मंत्रालयाने बनवली होती. ही समिती कुस्ती महासंघाचा कारभार पाहते.
या नव्याने होत असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना बजरंग म्हणाला,
Wrestlers, including Sakshi Malik and Bajrang Punia, reached Jantar Mantar again nonaction by the committee.
Will hold a press conference at 4 o'clock.#wrestler #jantarmanrar @BajrangPunia #Haryana pic.twitter.com/tUSFoY7KHq— Payal Mohindra (@payal_mohindra) April 23, 2023
“आम्ही पुन्हा उपोषणाला बसलो आहोत कारण, आम्हाला जी आश्वासने दिली गेली होती ती पूर्ण करण्यात आली नाहीत. सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.”
महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली येथील कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. एकूण 7 महिला कुस्तीपटूंनी त्यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. त्यापैकी एक मुलगी अल्पवयीन असल्याने पॉस्को कायद्यांतर्गत ही त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
🙏🏽🙌🏼 pic.twitter.com/Vm7RwPv11m
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) April 23, 2023