आज आयपीएल मध्ये एक सामना आहे या सामन्यामध्ये दिल्ली समोर हैदराबादचे आवाहन आहे दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला दिल्लीचे आघाडीचे सर्व फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले.
मात्र अनुभवी मनीष पांडे आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी चांगली भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दिल्लीने 20 षटकात मात्र 144 धावा केल्या.दोघांनीही सर्वाधिक 34- 34 धावा केल्या. तर गोलंदाजी मध्ये वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन गडी बात केल्या. भुवनेश्वर कुमारने चांगली साथ देत दोन गडी बात केले.
धावांचा पाठलाग करीत असताना हैदराबादची ही सुरुवात चांगली राहिली नाही. त्यांचेही फलंदाज एकापाठोपाठ बाद होत गेले. मयंक अग्रवाल वगळता एकाही फलंदाजाने साजेशी खेळी केली नाही.
शेवटी सुंदर आणि क्लासेसने छोटी भागीदारी करून अशा उंचावल्या मात्र ते विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. केवळ सात धावांनी दिल्लीने हैदराबाद वर विजय मिळविला आहे. हैदराबाद कडून मयंक अगरवाल ने सर्वाधिक 49 धावा केल्या. क्लासेन व सुंदरणे प्रत्येकी 31 व 24 धावा केल्या.