नुकत्याच दिनांक 21ते 23 एप्रिलनाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रग्बी स्पर्धेत संत सावता माळी विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावलाया खेळाडूंचा सत्कार, जि प सदस्य भारत आबा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला, यावेळी हिम्मत सोलांकर, सरपंच योगेश पाटील प्राचार्य हरिदास रणदिवे,व पालक उपस्थित होते.
जि प सदस्य शिवाजी पाटील विद्यालयाच्या संघाने औरंगाबाद व नाशिक विभागाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला, संघाकडून कर्णधार विक्रम वाघमारे, उप कर्णधार शैलेश गोंडावळे,श्रवण चवरे ,समर्थ चवरे,सुजल रणदिवे,सुयश भोसले, यांनी नेत्रदीपक कामगिरी केली तर गुरुप्रसाद पाटील,शहजादा तांबोळी,सुयश सुरवसे,विराज गाजरे ,हर्षवर्धन शिंदे यांचाही संघात समावेश होता,यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक संजय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच अंकुश चोपडे ,बाबासाहेब शेळके,बाबासाहेब शेंडगे,खुलचंद फडतरे, आबासाहेब सोलांकर यांनीही सहकार्य केले
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष बी. एस. पाटील,कार्याध्यक्ष भारत आबा शिंदे. सचिव एस डी कुलकर्णी सर,उपाध्यक्ष- शिवाजीराव पाटील सर, प्राचार्य हरिदास रणदिवे सर ,पर्यवेक्षक बळी खंडागळे सर,रग्बी संघटनेचे अध्यक्ष भिमराव बाळगे सचिव इक्बाल शेख, यांनी केले.