आज आयपीएल मध्ये एक सामना आहे यामध्ये गुजरात समोर मुंबईचे आवाहन आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गुजरातच्या फलंदाजांनी हा निर्णय सपशेल अपयशी ठरविला. सलामी वीर सहा वगळता सर्व फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. गिल ने सर्वाधिक 56 धावा केल्या. तर मिलर आणि मनोहर ने ही वेगवान प्रत्येकी 46 आणि 42 धावा केल्या. फलंदाजाच्या सुरेख फलंदाजीच्या बडावर गुजरातने वीस शतकात 207 धावांचा डोंगर उभा केला.
तर मुंबईकडून चावला ने दोन तर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. आज मुंबईने संघात दोन बदल केले. तर मुंबईकडून शर्मा किशन व ग्रीन सारखे विस्फोटक फलंदाज असल्याने सामना रोमांचक असण्याची शक्यता आहे.