• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, September 29, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

by pravin
September 28, 2026
in खेळ ( वैयक्तिक), राज्यस्तरीय, वुशू, स्पर्धा
Reading Time: 1 min read
राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
राज्यस्तरीय शालेय १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धेचे विभागीय क्रीडा संकुल, गारखेडा येथे उद्घाटन झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे; उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा; जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी जीएसटी उपायुक्त चंद्रशेखर बोर्डे, नवनाथ औताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर, तसेच तांत्रिक निवड समितीचे सदस्य दिनेश माळी, लक्ष्मण उदमले, अविनाश पाटील, महेश इंदापुरे, विजय खंडार, पांडुरंग अंभोरे आणि प्रमोद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे यांनी केले.
राज्य व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी क्रीडा सुविधांच्या विकासाला अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे चंद्रशेखर बोर्डे यांनी मनोगतात सांगितले.
स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील आठ विभागांमधून सुमारे २०० खेळाडू आले असून, त्यांच्यासोबत संघव्यवस्थापक आणि क्रीडा मार्गदर्शकही उपस्थित आहेत. बुधवारी १७ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेचा समारोप होणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने, डॉ. रेखा परदेशी, खंडू यादवराव, रामकिशन मायंदे, गणेश पाळवदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक पुनम नवगिरे, शिल्पा मोरे, तुषार आहेर, अनिल दांडगे, सीमा खोब्रागडे, सचिन बोर्डे आदी परिश्रम घेत आहेत.
Tags: Sports Panoramaक्रीडा व युवक सेवा संचालनालयछत्रपती संभाजीनगरराज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धाविभागीय क्रीडा संकुलवुशूशालेय क्रीडा स्पर्धा
ShareTweetSend
Next Post
गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.