ऋतुराज पुन्हा चमकला, चेन्नईचा विशाल स्कोर.

आयपीएल मध्ये एकच सामना आहे या सामन्यात चेन्नई समोर लखनऊचे आवाहन आहे. सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मैदानावर अचानक कुत्रा घुसल्याने सामना सुरुवात होण्यास थोडा विलंब झाला. मात्र याचा चेन्नईच्या सलामीविरावर काहीच परिणाम झाला नाही त्यांनी संघाला तुफान सलामी करून दिली. मागच्या सामन्यातला हिरो मराठमोळा ऋतुराज गायकवाड या सामन्यातही चमकला.

त्याने संघासाठी सर्वाधिक 57 धावांचे योगदान दिले. तर दुसरा सलामीवर कॉन्वेनेही 47 धाव केल्या. दुबे आणि रायडूनही जलद प्रत्येकी 27-27 धावा केल्या. तर कर्णधार धोनीने मात्र तीन चेंडू दोन षटकार खेचले.

तर दुसरीकडे लखनऊ कडून बिश्नोई सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला त्याने तीन गडी बात केले. मार्क वुडणेही तीन गडी बात केले मात्र त्यासाठी त्याने तब्बल 49 धाव मोजले. तर दुसऱ्या डावात लखनऊ समोर वीस शतकात 218 धावांचे लक्ष असणार आहे. लखनऊ कडेही एकापेक्षा एक टी ट्वेंटी चे सरस खेळाडू असून एक चांगला सामना होण्याची शक्यता आहे. लखनऊ संघाने आपल्या संघात दोन बदल केले तर चेन्नई संघाने आपल्या संघात एकही बदल केला नाही.

You might also like

Comments are closed.