सोमवार ( 3 एप्रिल ) आज आयपीएल मध्ये चेन्नई समोर लखनऊचे आवाहन होते सामन्यात लखनऊने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर मैदानावर कुत्रा घुसल्याने सामना थोडा उशिरा सुरू झाला. चेन्नईने पहिले फलंदाजी करताना वीस षटकात 217 धावांचा विशाल स्कोर उभा केला. चेन्नई कडून ऋतुराज गायकवाड ने सर्वाधिक 57 तर कॉन्व्हेने 47 धावांचे योगदान दिले. दुबे आणि रायडूनही प्रत्येकी 27-27 धावांचे योगदान दिले.
तर लखनऊ कडून बिश्नोई आणि गुड ने प्रत्येकी तीन गडी बाद केले. 218 धावांच्या विशाल स्कोर चा पाठलाग करताना लखनऊ ची सुरुवात ही चांगली राहिली. मायर्सने मात्र 22 चेंडू 53 धावा केल्या.
मात्र त्याला योग्य ती साथ न मिळाल्याने लखनऊ 205 धावापर्यंतच मजल मारू शकला. चेन्नई कडून अष्ट पहिले खेळाडू महिला सर्वाधिक चार गडी बात करून लखनऊचे कंबरडे मोडले. सामनाविराचा पुरस्कार मोईन अलीला देण्यात आला. तर उद्या दिल्ली समोर गुजरातचे आवाहन असणार आहे.