सिडनी : ऑस्ट्रेलियाचे ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि अॅशेस कसोटी मालिका विजेते प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाने दिलेला बोनस स्वीकारण्यास नकार दिला आहे. करोनाकाळात आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाने आपल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना कामावरून काढले.
या परिस्थितीत बोनस स्वीकारणे नैतिकदृष्टय़ा योग्य नसल्याचे लँगर यांनी म्हटले आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया मंडळाला करोनाचा मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या ४० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढावे लागले. तसेच त्यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वेतनातही कपात केली. त्यामुळे त्यांची जवळपास ४० मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलरची बचत झाली. लँगर यांच्या प्रशिक्षकपदाच्या करारात कामगिरीच्या आधारावरील बोनसचा समावेश आहे.