• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

रविंद्र जडेजाने गमावला ‘नंबर १’चा ताज, ‘या’ धाकड अष्टपैलूची अव्वलस्थानी उडी

by pravin
March 17, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, क्रिकेट
ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि आर अश्विन यांच्या मधल्या फळीमुळे संघाला आणखी चालना मिळेल?
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

ने नेहमीप्रमाणे बुधवारी म्हणजेच १६ मार्च रोजी सुधारीत कसोटी क्रमावारी जाहीर केली. भारतीय संघाने नुकतीच श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. कसोटी मालिकेत भारतीय संघ २-० अशा फरकाने जिंकला. परिणामी ताज्या कसोटी क्रमावारीत भारतीय खेळाडूंना फायदा झाला आहे. परंतु अष्टपैलू रवींद्र जडेजाला मात्र ताज्या क्रमवारीत नुकसान झाल्याचे दिसत आहे.

मागच्या आठवड्यात भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा  अष्टपैलू खेळाडूंच्या कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. परंतु ताज्या क्रमावीरीनुसार वेस्ट इंडीजचा जेसन होल्डर  अष्टपैलूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू झाली होती. पहिल्या कसोटी सामन्यातील अप्रतिम प्रदर्शनानंतर जडेजा कसोटी क्रमवारीत सर्वोत्तम अष्टपैलू बनला होता. पण पुढच्याच आढवड्यात त्याला जेसन होल्डरसाठी जागा मोकळी करावी लागली आहे.

🔹 Jasprit Bumrah breaks into top 5 💪
🔹 Jason Holder reclaims top spot 🔝
🔹 Dimuth Karunaratne rises 📈

Some big movements in the latest @MRFWorldwide ICC Men's Test Player Rankings 🔢

Details 👉 https://t.co/MQENhZlPP8 pic.twitter.com/8OClbDeDtS

— ICC (@ICC) March 16, 2022

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार केला, तर पहिला सामना ४ मार्चपासून मोहालीमध्ये खेळला गेला. पहिल्या सामन्यात भारतीय संघान एक डाव आणि २२२ धावांनी विजय मिळवला होता, ज्यामध्ये जडेजाचे योगदान बहुमूल्य होते. जडेजाने पहिल्या डावात नाबाद १७५ धावा केल्या आणि संपूर्ण सामन्यात एकूण ९ विकेट्सही घेतल्या होत्या. या प्रदर्शनानंतर तो सर्वोत्तम कसोटी अष्टपैलू बनला होता. परंतु दुसऱ्या कसोटी सामन्यात तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने ४, तर दुसऱ्या डावात २२ धावा केल्या, तसेच फक्त एक विकेट घेऊ शकला. असे असले तरीही, भारताने दुसरा कसोटी सामना २३८ धावांनी जिंकला.

दुसरीकडे वेस्ट इंडीज संघ इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिका खेळत आहे. वेस्ट इंडीज आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जेसन होल्डरने ८२ धावा केल्या आणि तीन विकेट्सही घेतल्या. या प्रदर्शनाच्या जोरावर त्याने जडेजाला पछाडत अष्टपैलूंच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे.

अष्टपैलूच्या क्रमवारीव्यतिरिक्त विचार केला तर, गोलंदाजांच्या यादीत भारतीय अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह  याने मोठी झेप घेतली आहे. बुमराह ६ स्थानांच्या फायद्यासह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तसेच दिग्गज विराट कोहली याला ४ स्थानांचे नुकसान सोसावे लागले आहे आणि तो फलंदाजांच्या यादीत ९ व्या क्रमांकावर आला आहे.

Tags: BCCICricketICCIndian teamJason HolderJasprit BumrahRavindra Jadeja loses 'No. 1' crownRavindra-JadejaVirat Kohli
ShareTweetSend
Next Post
औरंगाबादच्या तनिषाचे जाेरदार पुनरागमन, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

औरंगाबादच्या तनिषाचे जाेरदार पुनरागमन, राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.