भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज शुभमन गिल सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली नाही. गुजरातकडून खेळताना तो चमक दाखवू शकला नाही. या पूर्वी शुबमन गिल याच्या लग्नाच्या चर्चा अधूमधून सुरु असतात. काही दिवसांपूर्वी सारा तेंडुलकरसोबतच्या नात्याच्या तो चर्चेत आहे. त्याचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले होते. त्यात सारा अली खानचेही नाव जोडले गेल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. पण कॉफी विथ करणच्या ताज्या सीझनमध्ये सारा अली खानने यावर खुलासा केला. तिने म्हटले की ‘चाहत्यांचा साराबाबत गैरसमज झाला आहे.
परंतु आता शुभमन गिल हा दहा वर्षांनी मोठ्या असलेल्या टीव्ही कलाकार रिद्धिमा पंडित हिच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.दोघांचा विवाह येत्या डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.
सोशल मीडियावरील चर्चांनुसार डिसेंबरमध्ये जयपूरमध्ये त्यांचे लग्न होणार आहे. यासंदर्भात शुभमन गिल याच्याकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही. परंतु ‘बहू हमारी रजनीकांत’ मालिकेतील रिद्धिमा हिने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. तिने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कोण आहे रिद्धिमा पंडित
रिद्धिमा पंडित ‘बहू हमारी रजनीकांत’ या मालिकेमधून खूप प्रसिद्धी मिळाली. या शोमुळे ती रातोरात स्टार झाली. यामध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती. रिद्धिमा ‘खतरा खतरा’ सारख्या टीव्ही शोसाठी ओळखली जाते. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्येही ती दिसली होती. एकता कपूरच्या बेबसिरीजमध्ये तिने काम केले आहे.
काय म्हणाली रिद्धिमा
रिद्धिमा हिने म्हटले आहे की, शुभमन गिल याला ती वैयक्तीक ओळखतही नाही. सोशल मीडियावरील चर्चेनंतर मला सकाळपासून अभिनंदनाचे संदेश मिळू लागले आणि मी या चर्चांना नकार देऊन कंटाळले. शेवटी, मी माझ्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल पोस्ट करण्याचा निर्णय घेतला. मी लग्न करत नाही. माझ्या जीवनातील महत्वाचा निर्णय झाल्यास मी स्वत: कळवणार आहे, असे तिने म्हटले आहे.