छत्रपती संभाजीनगर (प्रतिंनिधि): नुकत्याच दिनांक २ जून रोजी श्रीरामपुर येथे आयोजित तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या राज्य संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ क्रीडा संघटक नीरज बोरसे यांची तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटने उपाध्यक्ष निरज बोरसे यांची ऑलिम्पिक मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासनाच्या आनुदानिक तायक्वांदो या खेळातील राज्य संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
हि निवड तायक्वांदो राज्य संघटनेचे उपाध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेवर करण्यात आली असल्याचे तायक्वांदो राज्य संघटनेचे अध्यक्ष डाॅ अविनाश बारगजे यांनी दि 02 जुन रोजी आयोजित सभेचे निरिक्षक तायक्वांदो फेडरेशन चे सहसचिव तथा तायक्वांदो राज्य संघटनेचे महासचिव मिलिंद पठारे, राज्य सहसचिव सुभाष पाटील, प्रविण बोरसे, उपाध्यक्ष दुलिचंद मेश्राम, कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, राज्य पदाधिकारी अजित घारगे, खेमसकर, राजेश महाजन, विनायक ऐनापुरे, भालचंद्र कुलकर्णी यांच्यासह महाराष्ट्रातील अठ्ठावीस जिल्ह्यातील जिल्हा सचिव व पाच जिल्ह्यातील हंगामी समित्यांचे पदाधिकारी व चेअरमन उपस्थित होते.
निवड का करण्यात आली
तायकांडो या खेळात खेळामध्ये मागील 25 वर्षापासून जिल्ह्यात,विभागात ,राज्यात तसेच राष्ट्रीयस्तरावर अतिशय उत्कृष्ट व मोलाचे कार्य करून जिल्ह्यात राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करून तसेच जिल्ह्यात तायकांडो या खेळाचे नाव तळागळात पासून उंचावर नेण्यावर मोलाचे कार्य करत असल्यामुळे त्यांच्या या कार्यास विचारात घेऊन राज्य संघटनेत रिक्त झालेल्या उपाध्यक्ष या पदाकरिता छत्रपती संभाजी नगरच्या नीरज बोरसे यांची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली आहे
तसेच या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष के.डी.शार्दुल तसेच सर्व कार्यकारी सभासद सचिव लता कलवार अमोल थोरात चंद्रशेखर जेऊरकर, गजेंद्र गवंडर, अंतरा हिरे शरद पवार, आशिष बनकर, कोमल आगलावे ,सागर वाघ, प्रतीक जांभुळकर, योगेश विश्वासराव, संतोष सोनवणे, शरद तिवारी, राजू जाधव, अविनाश नलावडे, प्रवीण वाघ, डॉ. डोनिका रुपरेल, कैलास विश्वकर्मा तसेच सर्व सीनियर व ज्युनिअर खेळाडू व पालकांनी व त्यांच्या पालक तसेच परिवाराने अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.