• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 22, 2025
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

जागतिक सायकलिंग दिन विशेष;स्मार्ट शहरातील मोकाट वाहतुकीस आवरा, सायकल ट्रॅक नको शोभेची वास्तू सायकलपटूंची मागणी

by pravin
June 3, 2022
in आंतरराष्ट्रीयस्तरीय, बातम्या, सायकलिंग
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

औरंगाबाद (प्रतिनिधि): प्रचंड वेगाने वाढतच चाललेली अनियंत्रित वाहतूक, अतिक्रमणांनी घेरलेले सायकल ट्रॅक केवळ शोभेची वास्तू नको, स्मार्ट शहरात सुरक्षितपणे सायकल चालविता आली पाहिजे, अशी अपेक्षा सायकलपटूंनी व्यक्त केली.

तीन जूनला सर्वत्र ” जागतिक सायकलिंग दिन” आयोजित केला जातो, त्या अनुषंगाने अनुभवी, नवोदित रायडर्सनी महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून माफक अपेक्षा व्यक्त करत आमचे शहर सायकलिंगची राजधानी बनेल असा विश्वास व्यक्त केला.

चाळीस वर्षांपासून सायकल चालवित आहे, महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशनच्या वतीने औरंगाबाद शहरात नुकत्याच दोन राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आपल्याकडे आता सायकल चालवणे त्यामुळे तंदुरुस्त ठेवणारे वातावरण निर्माण झाले आहे, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध सकाळी, संध्याकाळी सायकलिंग करतात. येथील सायकल ट्रॅक अडचणीचा आहे, पुण्यात असलेल्या सायकल ट्रॅक प्रमाणे येथे सायकल स्वारांसाठी मार्ग मोकळा झाला पाहिजे- भिकन आंबे (सचिव, महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशन)

भिकन आंबे (सचिव, महाराष्ट्र सायकलिंग फेडरेशन)

सायकलिंग म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली

दररोज सायकल चालवणे आरोग्यासाठी लाभदायक आहे, रक्तदाब, शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी आणि वजन आटोक्यात आणण्यासाठी हा सहजसोपा, विना इंधन उपाय आहे, वयाच्या दहाव्या वर्षीच सायकल हातात घेतली, वजनदार जुन्या सायकलवर अनेकदा दौलताबादवारी केली, आर्यमैन नितीन घोरपडे यांनी राईडची प्रेरणा दिली, औरंगाबाद सायकलिस्ट फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक हृदय दिवस, तंबाखू विरोधी दिवस, रक्तदाब दिनी सायकल राईड आयोजित करण्यात येते.आमच्या ग्रुपमध्ये डॉ.अरूण गावंडे, प्रशांत महाले, डॉ.उमा ठाकूर, आदी नामवंत सायकलपटू राईड करतात, सायकल चालविणारे एवढे वाढले पाहिजे की त्यातून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त वातावरण निर्माण होईल.मी स्वतः प्रदीर्घ अंतराची दोनशे, तीनशे आणि चारशे किलोमीटर ब्रेव्हेट केलेली आहे, भविष्यात तेराशे किलोमीटर अंतराची पैरिस बरेव्हेट करणार आहे – डॉ.विजय व्यवहारे (संस्थापक अध्यक्ष सायकलिस्ट फाऊंडेशन, औरंगाबाद)

 

कार्यालयातही सायकलवर जाते

नामांकित कंपनीत मैन्यू फैकचरींग कंपनीत कार्यरत आहे, सायकलिंगची पहिल्या पासून आवड आहे, सकाळी सायकल चालविल्यावर दिवसभर ताजेतवाने वाटते, आता २००किलोमिटरची ब्रेव्हेट करणार आहे, औरंगाबाद शहरात सुरक्षितपणे सायकल चालविणे अवघड वाटते, खड्ड्यांमुळे अंदाज चुकून सायकली बिघडतात, अपघातांची भिंती आहे, सायकल ट्रॅक शोभेची वास्तू नको, चिकलठाणा मार्गावरील ट्रक सह क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन रोडवरील सायकल ट्रॅक वाहनांच्या अतिक्रमणांनी वेढलेला असल्यामुळे तो निट करावा- उरवी पिपालिया

उरवी पिपालिया

 

काही वर्षांपूर्वी मी व्यायाम व्हावा म्हणून सायकलिंग ला सुरुवात केली होती, आता सायकल चालवणे हा माझ्या दिनचर्येचा भाग झाला आहे. सायकल चालविल्यामुळे मला सुदृढ शरीर व चांगले मित्र मिळाले, आपल्या शहरात आता सायकल चालविण्यासाठी सायकल ट्रॅक बनु लागले आहेत, मी औरंगाबादवासीयांना आवाहन करेल की त्यांनी जास्तीत जास्त सायकल वापरून आपला पैसे वाचवावेत व आरोग्य सुधारून औरंगाबाद शहराला खरेखुरे स्मार्ट शहर बनवावे.

डॉ प्रशांत महाले

शहात्तर वर्षांचे तरूण सांगवीकर 

जयंत सांगवीकर हे औरंगाबाद शहरातील सर्वात ज्येष्ठ सायकलपटू आहेत, ते दररोज, किमान पंचवीस पेक्षा जास्त किमी सायकलिंग करून आपल्या तंदुरुस्तीचा प्रत्यय देतात, बायपास शस्त्रक्रिया आणि अनियंत्रित मधुमेहावर त्यांनी सत्तरावया वर्षी सायकल चालविणे सुरू करत इतरांनाही प्रेरणा दिली आहे.

जयंत सांगवीकर

 

नवोदित दर्शन घोरपडे युथ आयकॉन

दर्शन नितीन घोरपडे याने आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सायकल चालविणयास प्रारंभ केला, आधी कमी यानंतर आत्मविश्वासाने लांब पल्ल्याची राईड पुर्ण केली.आता तर दोनशे किमी ब्रेव्हेट करत तो अठराव्या वर्षीच युथ आयकॉन बनला आहे

दर्शन नितीन घोरपडे

 

 

Tags: Latest sports newsMarathi sports newsSports NewsSPORTS NEWS latestWorld Cycling Day Special; Demand for Cycling
ShareTweetSend
Next Post

स्पोर्ट्स पॅनोरमा दणका; घुगे यांचे निलंबन मागे नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम

ताज्या बातम्या

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ - शांभवी जोडीचा अचूक निशाणा

७ वी खेलो इंडिया यूथ गेम्स; नेमबाजीत पार्थ – शांभवी जोडीचा अचूक निशाणा

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

खोखोत महाराष्ट्राची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी!

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

सॉफ्टबॉल महिलांचा संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.