स्पोर्ट्स पॅनोरमा दणका; घुगे यांचे निलंबन मागे नावंदे यांच्या एकाधिकारशाहीस लगाम

औरंगाबाद (प्रतिनिधी):जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे यांची सेवा खंडित करण्याचा कोणताही अधिकार कविता नावंदे यांना नाही असे स्पष्ट निर्देश राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले, याबाबत स्पोर्ट्स पॅनोरमाने नांवंदे यांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सविस्तर प्रकाश टाकला होता.
वादग्रस्त निर्णय, अधिकारी वर्गाकडून केली जाणारी अनियमित कामे, कर्मचाऱ्यांचे गैरहजर राहणे, नांदेड आणि अन्य तालुका क्रीडा अधिकारी यांच्यातील विसंवादामुळे विविध क्रीडा संघटना आणि खेळाडूंना नुकसान सोसावे लागल आहे.
मेडिकल बोर्डाने घुगे यांना तंदुरुस्त ठरवले असून नावंदे यांनी तानाशाहीचा वापर करत त्यांना घरी पाठवले होते. यासह वादग्रस्त ठरलेल्या सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी राजाराम दिंडे यांना बेकायदेशीरपणे कार्यालयीन कामकाज सोपविले होते, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी विभागीय क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांना या दोन्ही प्रकरणी लक्ष घालून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
स्पोर्ट्स पॅनोरमाने वारंवार हा मुद्दा बकोरिया यांच्या निदर्शनास आणून दिला. आयुक्तांनी आपल्या कर्तव्यदक्षतेचा प्रत्यय देत घुगे यांची अवैध बडतर्फी रद्दबातल ठरवली आहे.. स्पोर्ट्स पॅनोरमाने सतत खेळ, खेळाडू यांच्या हितासाठी कणखरपणे उभा आहे.
Comments are closed.