औरंगाबाद(प्रतिनिधी) जागतिक पर्यावण दिनानिमित्त औरंगाबादमधील रोटरीचे आठ क्लब मिळून सायकल रॅलीचे आयोजन केले होते.प्रदूषण टाळण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी सायकल वापरणे गरजेचे आहे, त्यासाठी जास्ती जास्त लोकांनी सायकल वापरणे गरजेचे आहे.हा संदेश देण्यासाठी सर्व रोटरी क्लबने या रॅलीचे आयोजन केले .
रॅलीस सकाळी सव्वा सहा वाजता सेव्हन हिल येथून प्रारंभ झाला.सिडको उड्डाण पूल चौकातून परत सेव्हनहील मार्गे क्रांती चौक येथे या राईडची समाप झाली.या रॅलीत माती वाचवा संघटनेचे अध्यक्ष पार्थ म्हस्के यांनी माती वाचविण्यासाठी , मातीत होणारे प्रदुषण टाळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले.रोटरी तर्फे शहरात ठिकठिकाणी पर्यावरणाचे संदेश देणारे बॅनर लावण्यात आले आहेत,असे चेअर पर्सन सरिता , मोना भूमकर यांनी सांगितले.
या राईडचा शुभारंभ सीएमआयचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू तसेच पीडीजी सुहास वैद्य यांनी केला.या वेळी सर्व रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे.मिलिंद सेवलीकर, रोटे. डॉ. सरताज पठाण, रोटे.राजेश शर्मा, रोटे तेजस कुलकर्णी, रोटे.एम.एस.पाटील, रोटे.स्वाती रोटे,ज्योती काथार, रोटे.मोना भूमकर, PDG , रोट्रॅक्ट क्लबचे अध्यक्ष शिवम भारूका आदी पदाधिकारी हजर होते.चरणजितसिंग , अतुल जोशी , सतीश अन्वेकर, विनय देव,शरद गोयल, सोनम शर्मा, राहुल गोखल्यांनी, सई जोशी, शंकर काकडे, मोहन उन्हाळे, युवराज काकणे, अभिषेक डोंगापुरे, सिद्धेश पणजकर आदी सायकल स्वार हजर होते.