औरंगाबाद (प्रतिनिधी): महाराष्ट्र जिमनॅस्टिक असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत अध्यक्षस्थपदी संजय शेटे (मुंबई शहर) यांची तर सचिवपदी औरंगाबाद येथील शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रा. डॉ.मकरंद जोशी यांची निवड करण्यात आली आहे.शेटे यांनी वीरेंद्र भांडारकर ( मुंबई उपनगर) यांचा २४ विरुद्ध २२ असा दोन मतांनी पराभव केला , तर सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. मकरंद जोशी ( जालना) यांनी राकेश केदारे (नाशिक)यांचा २५ विरुद्ध २१ चार मतांनी असा पराभव केला. संजय शेटे व मकरंद जोशी ही दुकली २०१५ ते २०१९ व २०१९ ते २०२२ या कालावधीसाठीही अध्यक्ष व सचिव म्हणून महाराष्ट्र अमॅच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनवर कार्यरत होती. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांची यादी खालील प्रमाणे.
अध्यक्ष :- संजय शेटे ( मुंबई शहर)
सचिव :- डॉ.मकरंद जोशी( जालना)
कार्याध्यक्ष :- के.जी.जाधव( कोल्हापूर)
कोषाध्यक्ष :- आशिष सावंत ( वैयक्तिक सभासद)
उपाध्यक्ष :-
१)सुनील चौधरी ( धुळे)
२संदीप जोशी ( पुणे)
३)मंगेश इंगळे ( वैयक्तिक सभासद)
४) माधुरी चेंडके ( अमरावती)
५)डॉ.आदित्य जोशी ( औरंगाबाद)
६) बाळू ढवळे ( ठाणे)
सहसचिव :-
१)दिपक बराड ( नागपूर)
२)सविता मराठे (पुणे)
३)संजय तोरस्कर ( कोल्हापूर)
(४) विजय पहुरकर ( बुलढाणा)
५ मंदार मात्रे ( मुंबई उपनगर)
सभासद :-
१) संतोष जोशी ( धुळे)
२)गणेश ठाकरे ( जालना)
३ सुरेश भगत ( वैयक्तिक सभासद)
४)मुकेश कदम ( रत्नागिरी)
५)अजय मापुस्कर ( वैयक्तिक सभासद)
६) संतोष पिंगळे ( बुलढाणा)
अधिक जोमाने कार्य करणार महाराष्ट्र जिमनॅस्टिक असोसिएशनवर सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा आनंदच आहे, संघटनेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत, भविष्यात देखील या प्रयत्नांना आणखी बळकटी देत मी, आदित्य आणि नवनिर्वाचित सदस्य काम करणार आहे –