• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, September 5, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

१९ सप्टेंबरपासून लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार

एडीसीएचे अध्यक्ष अतुल सावे, सचिव शिरीष बोराळकर यांची घोषणा

by pravin
September 5, 2026
in क्रिकेट, खेळ ( सांघिक ), जिल्हास्तरीय
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर

शालेय स्तरावरील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ही बहुप्रतिक्षित स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, शहरात शालेय क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे.
शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आयोजनाची घोषणा करण्यात आली. या पत्रकार परिषदेस औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे, सचिव शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष सचिन मुळे, सहसचिव करण डोगरा, खजिनदार अनिल इरावणे, कार्यकारिणी सदस्य सुशील वकील, सुधीर भालेराव, सुयोग माछर, आजीव सभासद किरण जोशी, चक्रधर दळवी, जगदीश भावठाणकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रारंभी सचिव शिरीष बोराळकर यांनी लोळगे ट्रॉफी आयोजनाविषयी माहिती सांगत प्रास्ताविक केले. त्यानंतर अध्यक्ष अतुल सावे यांनी लोळगे ट्रॉफीचे आयोजन शानदार पद्धतीने करण्यात येईल याची ग्वाही दिली. अतुल सावे यांच्या हस्ते लोळगे परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल लोळगे, सुहास लोळगे आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

माजी रणजीपटू अनंत नेरळकर यांनी स्पर्धेच्या नियोजनाची माहिती पीपीटीद्वारे दिली. या प्रसंगी दिनेश कुंटे, मनोज शहा, मनिंदरसिंग कानसा, कल्पेश शहा, अरुण गुदगे, प्रभूलाल पटेल, राहुल टेकाळे, कर्मवीर लव्हेरा, विनोद माने, शाकेर राजा, सय्यद जमशीद, विद्याधर पांडे, सिद्धार्थ भरणे, गंगाधर शेवाळे यांच्यासह आजी-माजी क्रिकेटपटू, संघटक यांची मोठी उपस्थिती होती.

या स्पर्धेत शहरातील २० निमंत्रित शाळांचे संघ सहभागी होणार आहेत. सहभागासाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ हे तत्त्व ठेवण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व सामने टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवले जातील. साखळी आणि बाद अशा दोन्ही फेऱ्यांमध्ये हे सामने पार पडणार असून दररोज ३ सामन्यांचे आयोजन केले जाईल. खेळाडू पांढऱ्या गणवेशात लाल चेंडूने खेळतील. या स्पर्धेतील सामने एडीसीए आणि देवगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.

रोख पारितोषिके व वैयक्तिक पुरस्कार

स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख व मानाचा चषक, तर उपविजेत्या संघाला ३१ हजार रुपये रोख आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मालिकावीर, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज तसेच प्रत्येक सामन्यात सामनावीर अशी वैयक्तिक पारितोषिके देऊन प्रोत्साहित केले जाईल.
स्पर्धा संयोजन समिती

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजन समितीची घोषणा करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून राहुल टेकाळे काम पाहत आहेत. त्यांच्यासोबत समिती सदस्य म्हणून अनंत नेरळकर, सय्यद जमशेद, प्रसाद कुलकर्णी, पवन डोंगरे, जगदीश भावठाणकर, मनोज शाह, ॲड. कल्पेश शाह, विद्याधर पांडे, असिर सिद्दीकी, सिद्धार्थ भरणे, उदय बक्षी आणि हेमंत मुळे हे जबाबदारी सांभाळत आहेत. शालेय स्तरावर दर्जेदार क्रिकेटपटू घडवण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

नवोदित क्रिकेटपटूंना मिळणार मोठे व्यासपीठ

शालेय क्रिकेटमधूनच भविष्यातील दर्जेदार क्रिकेटपटू घडण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे शहरातील विविध शाळांमधील प्रतिभावान खेळाडूंना स्पर्धात्मक वातावरण, दर्जेदार मैदाने आणि स्वतःची क्षमता दाखविण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे.

१९ सप्टेंबरपासून सुरू होणारी ‘लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा २०२६’ शहरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल आणि त्यातून भविष्यातील गुणवंत क्रिकेटपटू पुढे येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Tags: ADCAAurangabad District Cricket AssociationCricket Tournament 2026Inter School CricketLolge Inter School Cricket Tournament 2026Sports PanoramaT20 Cricketअतुल सावेअनंत नेरळकरछत्रपती संभाजीनगर क्रिकेटदेवगिरी महाविद्यालयराहुल टेकाळेलोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धाशालेय क्रिकेटशिरीष बोराळकर
ShareTweetSend
Next Post
सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

ताज्या बातम्या

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

सिडकोचे वाळूज महानगर स्टेडियम लवकरच खेळाडूंसाठी खुले होणार

१९ सप्टेंबरपासून लोळगे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती

वुशू संघटनेतील कथित गैरप्रकारांचा वाद हायकोर्टात; राज्य अजिंक्यपद व निवड चाचण्यांना अंतरिम स्थगिती

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मनपा खेळाडूंचा गौरव; राज्यस्तरीय गुणवंतांचा सन्मान

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.