• बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
Tuesday, November 17, 2026
  • Login
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result
Home बातम्या

व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा – क्रीडा मंत्री गिरीश महाजन

by pravin
September 3, 2022
in बातम्या, राज्यस्तरीय
0 0
व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा - क्रीडा मंत्री गिरीश महाजन
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (प्रतिनिधी): मोबाईल आणि संगणकाच्या युगात आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. मुलांना शालेय जीवनापासून मैदानी खेळासाठी वेळ दिला पाहिजे. शाळेत शारीरिक शिक्षणाचा तास पुन्हा सुरु करणे आवश्यक असून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खेळाला विशेष महत्त्व असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉन बॉस्को विद्यालयात ऑलम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करण्यात आले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात दरवर्षी 29 ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा या दिवशी जन्म झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ क्रीडा दिन साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांचे देशातील हॉकी खेळासाठी मोठे योगदान आहे. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा झेंडा फडकावला होता आणि हॉकीमध्ये तीन वेळा देशाला सुवर्णपदक मिळवून दिले होते. क्रीडा दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती हे द्रोणाचार्य, मेजर ध्यानचंद आणि अर्जुन पुरस्कार देऊन खेळाडूंचा गौरव करतात. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक प्रेरणादायी आणि व्यक्तीमत्त्व आहे. सरकारने ध्यानचंद यांना पद्मभूषण पुरस्कार देवून गौरविले आहे.

राष्ट्रकुल आणि खेलो इंडिया स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसांच्या रक्कमेत मोठी वाढ

मंत्री श्री. महाजन म्हणाले, देशातील पंजाब, हरियाणा या राज्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता देत असलेल्या बक्षिस रक्कमेच्या तुलनेत राज्य देत असलेली रक्कम कमी होती. ती जवळपास 5 पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडुंना 10 लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम 50 लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडुंसाठी 7.50 लाख रुपये ऐवजी 30 लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडुंना 5 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेच्या पदक विजेते आणि सहभागी खेळाडूंना पूर्वीपेक्षा तिप्पट रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंशी थेट संवाद साधतात. तसेच पदक विजेत्यांचे प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करतात. ते खेळांकडे गांभिर्याने बघतात.

अभ्यासाबरोबरच खेळही महत्त्वाचा

स्वस्थ शरीरातच स्वस्थ मनाचा विकास होतो” जी मुले अभ्यासाबरोबरच खेळातही भाग घेतात ती चपळ, उत्साही असतात. त्यांची हाडे मजबूत आणि चेहरा तजेलदार होतो. पचनशक्ती चांगली राहते. डोळे चांगले राहतात, शरीर वज्राप्रमाणे होते. व्यायाम न केल्यास मनुष्य आळशी व निस्तेज बनतो असे त्यांनी सांगितले.

खेळात कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. त्यामुळे आपल्या अंगी खिलाडूपणा येतो. एक प्रकारची निकोप स्पर्धा निर्माण होते. संघभावना वाढीस लागते. पुढे जगात वावरताना आपल्याला चारचौघांना घेऊन कसे चालायचे ते समजते त्यामुळेच खेळांचे महत्त्व फार आहे. सर्वांनाच लहानपणी खेळायला मिळाले पाहिजे. प्रत्येक बालकाचा तो हक्कच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चर्च गेट येथील हॉकी मैदानात अभिवादन आणि हॉकी सामन्यास सुरूवात

तत्पूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी चर्च गेट येथील हॉकी मैदानात सकाळी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हाँकी सामना खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा देवून सामना सुरू केला.

या कार्यक्रमास शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण सचिव रणजित सिंह देओल तसेच पुरस्कार प्राप्त खेळाडू एम. एम. सोमय्या, कमलेश मेहता, प्रदीप गंधे, जय कवळी डॉन बास्को शाळेच मुख्याध्यापक फादर क्रीस्पियानो आदींची उपस्थिती होती. यावेळी शालेय विद्यार्थींनींनी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. प्रास्ताविक उपसंचालक स्नेहल साळुंके, सूत्रसंचालन प्रियंका बुवा यांनी तर आभार मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी मानले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार

एम. एम. सोमय्या हॉकी ऑलिंपिक सुवर्णपदक प्राप्त खेळाडू, कमलेश मेहता टेबल-टेनिस अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू, प्रदिप गंध बॅडमिंटन ध्यानचंद पुरस्कार प्राप्त खेळाडू, जय कवळी बाक्सिंग ऑलिंपिक स्पर्धा, हिमाजी परब अर्जुन पुरस्कारप्राप्त मल्लखांब, शिवाजी पाटील फुटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, वर्षा उपाध्ये रिदमिक जिमनॅस्टीक्स शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व मार्गदर्शक, प्रशांत मोरे कॅरम जागतिक विजेतेपद प्राप्त खेळाडू, अब्दुल हमिद खान – बास्केटबॉल शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, नताशा जोशी – नेमबाजी डेफ ऑलिंपिक्स सहभाग, रिचा रवी बास्केटबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू, वैभवी इंगळे – तलवारबाजी जागतिक कॅडेट स्पर्धा, सौम्या परुलकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा सानिया कुंभार रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, मिहिका बांदिवडेकर रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, वैभवी बापट रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, सृष्टी पटेल रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, जान्हवी वर्तक रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा, निश्का काळे रिदमिक जिमनॅस्टीक्स जागतिक शालेय स्पर्धा. या खेळाडूंचा सत्कार यावेळी क्रीडा मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला.

Tags: Latest sports newsMarathi sports news Sports DaySports Minister Girish Mahajanक्रीडा मंत्री गिरीश महाजन

pravin

Related Posts

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड
आंतरराष्ट्रीयस्तरीय

आशियाई बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्याच्या दोन खेळाडूंची निवड

April 4, 2025
महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारी
नॅशनल गेम्स

महाराष्ट्राच्या पूजा दानोळेची सुवर्णभरारी

January 30, 2025
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जिम्नॅस्टिक्समहाराष्ट्राचे ‘सुवर्णपंचक’
जिम्नॅस्टिक

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जिम्नॅस्टिक्समहाराष्ट्राचे ‘सुवर्णपंचक’

April 7, 2025
गेल्या नऊ वर्षांत क्रीडाविषयक खर्चात तिप्पट वाढ! पंतप्रधान नरेंद्र मोदी
नॅशनल गेम्स

गेल्या नऊ वर्षांत क्रीडाविषयक खर्चात तिप्पट वाढ!- पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 7, 2025
मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये दोन रौप्य, दोन कांस्य पदके
अन्य खेळ

मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये दोन रौप्य, दोन कांस्य पदके

April 7, 2025
खेळाडूंचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीचे क्रीडा मंत्री महाजन यांच्या हस्ते उदघाटन
नोकरी भरती

खेळाडूंचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रणालीचे क्रीडा मंत्री महाजन यांच्या हस्ते उदघाटन

November 30, 2022
Load More
Next Post
राज्यात फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

राज्यात फिफा महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धा - क्रीडा मंत्री गिरीश महाजन

Connect with us

  • 24k Followers
  • Trending
  • Comments
  • Latest
शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप

October 23, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

वुशू संघटनेला हायकोर्टाचा मोठा धक्का! सप्टेंबरमधील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यास नकार; आता क्रीडा विभागाच्या नियंत्रणाखाली नव्याने निवड चाचण्या

October 16, 2026
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया

October 9, 2026

बाहुबलीची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात ;

ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाला शुभेच्छा तर दिल्या मात्र, फरहानने केली ‘ही’ चूक

भारतीय महिला हॉकी संघाचं शाहरुखकडून कौतुक म्हणाला, ‘तुम्ही मन दुखावलं आहे पण…’

एकदा ऑलिम्पिक संपलं तर की मग पून्हा आपण आपल्या विश्वात रमायला मोकळे.

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026
आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

आयओए निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता; सोशल मीडिया प्रचारासह वैयक्तिक टीकेवर बंदी

November 2, 2026
ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

ईएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या मायरा शेख हिला दुहेरी मुकुट

November 2, 2026

Recommended

About Us

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Read more

Categories

  • Football
  • ॲथलेटिक्स
  • अन्य खेळ
  • आंतरराष्ट्रीयस्तरीय
  • आयपीएल
  • आयपीएल
  • आशियाई क्रीडा स्पर्धा
  • ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स
  • कबड्डी
  • कराटे
  • कुस्ती
  • क्रिकेट
  • खेलो इंडिया
  • खेलो इंडिया बीच स्पर्धा
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेलो इंडिया यूथ गेम्स
  • खेळ ( वैयक्तिक)
  • खेळ ( सांघिक )
  • खेळाडू
  • खो-खो
  • जलतरण
  • जिम्नॅस्टिक
  • जिल्हा
  • जिल्हास्तरीय
  • ज्युडो
  • टी-20 वर्ल्ड कप
  • टेबल टेनिस
  • तलवारबाजी
  • तायक्वांदो
  • तालुकास्तरीय
  • धनुर्विद्या
  • नॅशनल गेम्स
  • नेमबाजी
  • नोकरी भरती
  • पुरस्कार
  • प्रो कबड्डी
  • फिफा वर्ल्ड कप
  • बातम्या
  • बुद्धिबळ
  • बॅडमिंटन
  • बॅडमिंटन
  • बेसबॉल
  • बॉक्सिंग
  • ब्लॉग
  • मल्लखांब
  • महाराष्ट्र केसरी कुस्ती
  • महिला महाराष्ट्र केसरी
  • युनिव्हर्सिटी गेम्स
  • योगा
  • योजना
  • रणजी करंडक
  • राज्य
  • राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां
  • राज्यस्तरीय
  • राज्यस्तरीय मिनी ऑलिंपिक
  • राष्ट्रकुल स्पर्धा
  • राष्ट्रीय
  • राष्ट्रीयस्तरीय
  • रोईंग
  • लाईव्ह
  • लॉंग टेनिस
  • विभागीयस्तरीय
  • वुशू
  • वेटलिफ्टिंग
  • व्हॉलीबॉल
  • सॉफ्टबॉल
  • स्क्वॉश
  • स्पर्धा
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
  • स्पोर्ट्स पॅनोरमा विशेषांक
  • हँडबॉल
  • हॉकी

Tags

36th National Games 36th National Sports Tournament News 37th National Games Goa 37th National Games Goa news bbci BCCI Chhatrapati Sambhajinagar Commonwealth Games 2026 COMPATATION Cricket Cricket News CWG 2026 Football Glasgow 2026 Hockey india Indian ipl ipl 2022 IPL Indian premier league IPL Indian premier league 2021 cricket BCCI khelo india youth games 2021 khelo india youth games 2021 Marathi News Latest sports news latest sports news marathi live maharashtra Maharashtra Sports News Marathi sports news match NEWS Play Pro Kabaddi result schulde Sports News SPORTS NEWS latest Sports news live sports news marathi Sports Panorama team india TENNIS Virat Kohli win छत्रपती संभाजीनगर

Recent News

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

पी. टी. उषांच्या दुसऱ्या डावाची तयारी; IOA अध्यक्षपदासाठी पाठिंब्याचे गणित जमणार?

November 15, 2026
वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

वाहनचालकाच्या सन्मानार्थ उपसंचालक बनले सारथी!

November 15, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In