सातारा (प्रतिनिधी): बॉक्सिग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आशियाई बॉक्सिंग स्पर्धा अनुषंगाने भारतीय संघ निवड चाचणी दिनांक ३० मार्च २०२५ ते दि. ०३ एप्रिल २०२५ रोजी रोहतक हरियाणा येथे नुकत्याच पार पडलेल्या आहेत त्यामध्ये १५ वर्षाखालील मुले आणि मुली वयोगटात सातारा जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दोन खेळाडू यश भगवान निकम (३०-३३ किलो वजनी गट) व समृध्दी सतीश शिंदे (५२-५५ किलो वजनी गट) यांनी अतिशय उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावत वर्ल्ड बॉक्सिग असोसिएशन यांच्या वतीने अमन, जॉर्डन येथे १७ एप्रिल ते २ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या १५ वर्षा खालील मुले, मुली आशियाई बॉक्सींग स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सिग संघात निवड झाली आहे.
यांना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले या ऐतिहासिक यशाबद्दल सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र चोरगे ,सचिव राजेंद्र हेंद्रे, सदस्य योगेश मुंदडा आणि सातारा जिल्ह्यातील इतर क्लबचे पदाधिकारी जगन्नाथ जगताप, रवींद्र होले, मंगेश जाधव, देवेंद्र बारटक्के, अमर मोकाशी आदिने शुभेच्छा दिल्या.