• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, August 25, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राहुल टाक यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदी निवड

by pravin
August 25, 2026
in खेळ ( वैयक्तिक), बातम्या, बॉक्सिंग, राज्यस्तरीय
Reading Time: 1 min read
राहुल टाक यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदी निवड
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदी छत्रपती संभाजीनगरचे राहुल टाक यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या बॉक्सिंग क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, जिल्ह्यातील बॉक्सिंग क्षेत्रातून त्यांच्या निवडीचे स्वागत होत आहे.

राहुल टाक हे गेल्या अनेक वर्षांपासून बॉक्सिंग क्षेत्रात प्रशिक्षक तसेच संघटनात्मक कार्यात सक्रिय आहेत. खेळाडूंना मार्गदर्शन करण्याबरोबरच बॉक्सिंगच्या विकासासाठी विविध स्तरांवर ते कार्यरत आहेत. त्यांच्या अनुभवाची दखल घेत महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनने त्यांच्यावर यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

बॉक्सिंग स्पर्धांमध्ये खेळाडूंचे योग्य वयोगटातील वर्गीकरण, वयासंदर्भातील नियमांचे पालन आणि वयाच्या नोंदींशी संबंधित गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने यूथ व एज फ्रॉड कमिशनची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे राहुल टाक यांच्यावर आलेली ही जबाबदारी संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील युवा तसेच विविध वयोगटातील बॉक्सिंग खेळाडूंना होईल आणि खेळाडूंच्या हिताच्या दृष्टीने ते प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास बॉक्सिंग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव डॉ. राकेश तिवारी, कोषाध्यक्ष मिलन वैद्य आणि सहसचिव धनंजय बनसोड यांनीही  टाक यांचे अभिनंदन करून यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिव म्हणून त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. राहुल टाक यांच्या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत देशमुख, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर चव्हाण आणि सचिव रोहन टाक यांनी त्यांचे अभिनंदन केले. नवीन जबाबदारीत राहुल टाक यशस्वी कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Tags: Boxing MaharashtraBoxing NewsChhatrapati Sambhajinagar BoxingMaharashtra Sports NewsMaharashtra State Boxing AssociationRahul TakSports PanoramaYouth and Age Fraud Commissionछत्रपती संभाजीनगर बॉक्सिंगमहाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनयूथ व एज फ्रॉड कमिशनराहुल टाक
ShareTweetSend

ताज्या बातम्या

राहुल टाक यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदी निवड

राहुल टाक यांची महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या यूथ व एज फ्रॉड कमिशनच्या सचिवपदी निवड

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त मल्लखांब प्रशिक्षकावर POCSO गुन्हा; 2019 च्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’पासून पुरस्कारापर्यंत चौकशीची मागणी

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त मल्लखांब प्रशिक्षकावर POCSO गुन्हा; 2019 च्या ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’पासून पुरस्कारापर्यंत चौकशीची मागणी

‘आम्हाला खेळू द्या’ अंतर्गत स्वातंत्र्य दिनी शिवकालीन युद्धकला व मल्लखांबचे शानदार प्रात्यक्षिक

‘आम्हाला खेळू द्या’ अंतर्गत स्वातंत्र्य दिनी शिवकालीन युद्धकला व मल्लखांबचे शानदार प्रात्यक्षिक

संघर्षातून ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’पर्यंत झेप घेणारा आदित्य तळेगावकर; २४व्या वर्षी थांबला जिद्दी जिम्नॅस्टिकचा प्रवास

संघर्षातून ‘वर्ल्ड चॅम्पियनशिप’पर्यंत झेप घेणारा आदित्य तळेगावकर; २४व्या वर्षी थांबला जिद्दी जिम्नॅस्टिकचा प्रवास

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.