• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, September 29, 2026
  • Login
Sports Panorama
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
  • बातम्या
  • क्रिकेट
    • आयपीएल
    • टी-20 वर्ल्ड कप
  • कबड्डी
  • नॅशनल गेम्स
  • पुरस्कार
  • योजना
  • स्पर्धा
  • अन्य खेळ
  • खेळाडू
  • स्पोर्ट्स पॅनोरमा दणका
No Result
View All Result
Sports Panorama
No Result
View All Result

राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 : ‘खेलेगा भारत, खिलेगा भारत’चा नारा; छत्रपती संभाजीनगरात तीन दिवस विविध क्रीडा उपक्रम

by pravin
August 26, 2026
in अन्य खेळ, बातम्या
Reading Time: 1 min read
राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 : ‘खेलेगा भारत, खिलेगा भारत’चा नारा; छत्रपती संभाजीनगरात तीन दिवस विविध क्रीडा उपक्रम
Share on FacebookShare on TwitterShare on WhatsApp

प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर

भारतीय हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 29 ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय क्रीडा दिन 2026’ निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा तीन दिवस विविध क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “खेलेगा भारत, खिलेगा भारत” या संकल्पनेअंतर्गत 28 ते 30 ऑगस्ट 2026 या कालावधीत हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि भारतीय खेळ प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येत असून, यंदाची संकल्पना “Tribute, Play and Move” अर्थात “आदर, खेळ आणि हालचाल” या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित आहे.

28 ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांना ‘Digital Tribute’

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या उपक्रमांची सुरुवात 28 ऑगस्ट रोजी ‘Digital Tributes’ या उपक्रमाने होणार आहे. यामध्ये मेजर ध्यानचंद यांना पारंपरिक पद्धतीने अभिवादन करण्याबरोबरच डिजिटल माध्यमातून मानवंदना देण्यावर भर देण्यात आला आहे.

मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे, एक मिनिट मौन पाळून मानवंदना देणे, त्यांच्या क्रीडा कारकिर्दीची माहिती देणे, त्यांच्या जीवनावर आधारित डिजिटल सादरीकरण करणे तसेच उपस्थितांकडून Digital Tribute Video तयार करून सोशल मीडिया आणि WhatsAppच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राविषयी जनजागृती करण्याचे नियोजन आहे.

29 ऑगस्टला ‘29 Challenge’

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुख्य दिवशी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी ‘29 Challenge’, ‘Pass the Ball’, ‘Sports Bandhan’ आणि ‘एक घंटा खेल के मैदान में’ यांसारखे अभिनव उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

‘29 Challenge’मध्ये प्रत्येक सहभागी आपल्या क्षमतेनुसार 29 Squats, 29 Jumping Jacks, 29 Spot Jumps, 29 सेकंद Plank, 29 Skipping, 29 Shuttle Runs किंवा 29 Push-ups यापैकी उपक्रम करू शकणार आहे. या माध्यमातून नागरिकांनी केवळ क्रीडा स्पर्धा पाहण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष शारीरिक हालचाली आणि व्यायामात सहभागी व्हावे, असा संदेश दिला जाणार आहे.

‘Pass the Ball’मधून — “मी खेळणार, तुम्हीही खेळा!”

‘Pass the Ball’ या उपक्रमात एक चेंडू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे दिला जाणार आहे. क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक, लोकप्रतिनिधी, पालक आणि नागरिक अशा विविध घटकांचा यात सहभाग अपेक्षित आहे.

चेंडू स्वीकारताना सहभागी व्यक्तीने “मी खेळणार, तुम्हीही खेळा!” असा संदेश देण्याची संकल्पना आहे. याद्वारे खेळ आणि शारीरिक सक्रियतेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘Sports Bandhan’मधून खेळाडू आणि समाजाचे नाते दृढ

‘Sports Bandhan’ हा उपक्रम केवळ मनगटावर बँड बांधण्यापुरता मर्यादित नसून खेळाडू आणि समाजातील नाते अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणार आहे. सहभागींच्या मनगटावर Sports Band अर्थात ‘क्रीडा बंधन बँड’ बांधून खेळाशी असलेले नाते अधोरेखित केले जाणार आहे.

30 ऑगस्टला ‘Sunday on Cycle’ आणि ‘Run and Ride’

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप 30 ऑगस्ट रोजी ‘Sunday on Cycle’ आणि ‘Run and Ride’ या उपक्रमांनी होणार आहे. रविवारी सकाळी 8.30 ते 9 वाजेदरम्यान सायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीची सुरुवात विभागीय क्रीडा संकुलातून होईल. तेथून सुतगिरणी चौक, जवाहर पोलीस स्टेशन मार्गे यू-टर्न घेऊन पुन्हा सुतगिरणी चौक आणि त्यानंतर विभागीय क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांना सहभागाचे आवाहन

राष्ट्रीय क्रीडा दिन हा केवळ खेळाडूंचा उत्सव न राहता समाजातील प्रत्येक व्यक्तीला खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीशी जोडणारा उपक्रम ठरावा, या दृष्टीने विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.

या सर्व उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील खेळाडू, विद्यार्थी तसेच छत्रपती संभाजीनगरकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मुकुंद वाडकर यांनी केले आहे.राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने मेजर ध्यानचंद यांच्या महान क्रीडा वारशाला अभिवादन करण्यासोबतच नव्या पिढीला मैदान, व्यायाम आणि सक्रिय जीवनशैलीशी जोडण्याचा प्रयत्न या तीन दिवसांच्या उपक्रमांतून केला जाणार आहे.

Tags: 29 ChallengeDigital TributeMajor Dhyan ChandNational Sports Day 2026Pass the BallRun and RideSports BandhanSports News MaharashtraSports PanoramaSunday on Cycleक्रीडा व युवक सेवा संचालनालयखेलेगा भारत खिलेगा भारतछत्रपती संभाजीनगरजिल्हा क्रीडा अधिकारीमुकुंद वाडकरमेजर ध्यानचंदराष्ट्रीय क्रीडा दिन 2026
ShareTweetSend
Next Post
%%title%% राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : खेळातून उज्ज्वल करिअर; 5% आरक्षण ते थेट नियुक्तीपर्यंत संधी

राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष : खेळातून घडते उज्ज्वल करिअर; 5% क्रीडा आरक्षण, थेट नियुक्तीपासून स्पोर्ट्स सायन्सपर्यंत संधींचे नवे विश्व

ताज्या बातम्या

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

एन-७ मनपा शाळेच्या खेळाडूंचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

गणपती बाप्पा सायकलिंग चॅलेंजचे पारितोषिक वितरण

सायकलिंग चॅलेंज स्पर्धेचे बक्षीस वितरण

राज्यस्तरीय शालेय वुशू स्पर्धेचे छत्रपती संभाजीनगरात उद्घाटन

“राज्यस्तरीय शालेय 17 वर्षांतील मुले व मुलींच्या वुशू क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

लोळगे चषकात स्वरीत दरकचा दुहेरी सन्मान; दीपेश बोर्डे सर्वोत्तम गोलंदाज

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Sports Panorama
  • Login

© 2024 Sports Panorama - Powered by Enrich Media.